*पठाण शरीफ खान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सम्मानित*
जालना: (प्रतिनिधि)
कश्मकश दिव्य वार्ताच्या ११ व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळा बीड येथील हॉटेल गोल्डन चाईज येथे थाटात संपन्न झाला,
या पुरस्कार वितरण सोहळ्यात जालन्यातील सुप्रसिद्ध शैक्षणिक संस्थ पीपल्स उर्दू प्राथमिक शाळा, पेंशनपुरा जालना येथील ज्येष्ठ शिक्षक पठाण शरीफ खान याना राज्यस्तरीय मौलाना आझाद आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले.
सदरील पुरस्कार वितरण कार्यक्रमात खासदार डॉ.प्रीतम ताई मुंडे, माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षिरसागर, माजी मंत्री सुरेश नवले, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष मुहंमद खान, मौलाना शफीक कास्मी, जमीर कादरी, डॉ.शोएब हाश्मी, संतोष नाना भंडारी, नासिर सिद्दीकी व इतर पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते पठाण शरीफ खान यांना मौलाना आझाद आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल, सर्वत्र अभिनंदनाचा व शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.