रामनाथ विद्यालयात श्रीनिवास रामानुजन जयंती साजरी

रामनाथ विद्यालयात श्रीनिवास रामानुजन जयंती साजरी




 आलमला. रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला. ता.औसा येथे दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस गणित दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .सर्वप्रथम श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन गणित विषयाचे अध्यापक श्री पंडगे एन. एन .यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या समोर कु.उंबरगे श्रावणी या विद्यार्थिनीने गणित दिनानिमित्त सर्वांना गणित प्रतिज्ञा दिली,व या जयंती दिनानिमित्त कु. चरकपल्ले अंजली या विद्यार्थिनीने श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारे भाषण केले .त्यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणितीय शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन एका सभागृहामध्ये मांडण्यात आले होते. या प्रदर्शनाचा विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. याप्रसंगी याची पाहणी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता पाटील, पर्यवेक्षक श्री पाटील पी.सी.,गणित शिक्षिका सौ. निलंगेकर एस.एस., श्री पंडगे एन. एन., श्री नलवाडे एन.जे.व भास्कर सुर्यवंशी यांनी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या