मातृ भाषेतून शिक्षण हे पायाभूत शिक्षण असते ... संतोष सोमवंशी जाहेदा बेगम उर्दू प्रा.शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

 मातृ भाषेतून शिक्षण हे पायाभूत शिक्षण असते ... संतोष सोमवंशी 

जाहेदा बेगम उर्दू प्रा.शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न....











  औसा( मुस्लिम कबीर) लामजना ता. औसा येथिल जाहेदा बेगम उर्दू प्रायमरी स्कूल चा वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांच्या हस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक  तथा संस्थाध्यक्ष अँड.समियोदिन मुजीबुद्दिन पटेल होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हजरत सुरत शाह उर्दू शाळेचे मुख्याध्यापक म. शफियोद्दिन पटेल, लामजना चे उपसरपंच बालाजी पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख महेश सगर, हिप्परसोगा सरपंच मनोज सोमवंशी, धानोरा सरपंच सुरेश मुसळे,अँड.सय्यद एजाज, डॉ. पटेल, गनी सर, आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन शेख चांद सर,तर प्रास्ताविक  मुख्याध्यापक सलाहोद्दिन पटेल  यांनी मांडले. आपले उद्घाटनपर भाषणात संतोष भाऊ सोमवंशी यांनी उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये होत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा कौतुक करून मातृ भाषेत शिक्षण हे पायाभूत शिक्षण असते याच्या माध्यमातूनच पुढील शिक्षणाची दिशा ठरते असे सांगून उर्दू भाषा ही भारतीय संस्कृती ची अविभाज्य घटक असल्याचे सांगितले.व सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलांचा आस्वाद ही घेतला व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी पत्रकार म.मुस्लिम कबीर यांनी उर्दू भाषेतून शिक्षण का घ्यावे? असा प्रश्न करून उर्दू भाषा माध्यमातून शिक्षण घेवून आज देशात मोठं मोठ्या पदांवर कार्य करत असलेल्या व्यक्तींची नावे सांगितली. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड.समियोदिन पटेल यांनी समारोप करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था प्रयत्नशील असून  माजी  नगराध्यक्ष  मरहुम अँड. मुजीबुद्दिन पटेल यांचे स्वप्नातील शाळा व शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देण्याचे प्रयत्न राहणार आहे.

 आभार शेख वहिदा बाजी यांनी व्यक्त केले. यावेळी  विद्यार्थ्यांनी 32 प्रकारच्या विविध  कला सादर करून उपस्थितांची दाद मिळविली , व उपस्थित पालकांनीही या बल कलाकारांचे नगदी रक्कम देवून गौरविले.यावेळी सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी पालक,गावकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या