फत्तेपुरला बालस्नेही गाव निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्या मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल
औसा प्रतिनिधी श्रीमती लक्ष्मीबाई ढेंकरे माध्यम विद्यालय फतेपुर या विद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली असून वर्ग खोल्यांना महामानवाचे नावे देऊन ज्ञानवर्धनाचे कार्य चांगल्या पद्धतीने होत असल्याचे पाहून समाधान वाटते.फत्तेपूर गावाला येणाऱ्या काळामध्ये बाल स्नेही गाव निर्माण करण्यासाठी संस्थेचे संचालक मंडळ शिक्षक गावातील सरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपणास लागणारे सहकार्य आम्ही निश्चित देऊ असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले. फत्तेपूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई ढेंकर विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व्यंकटराव पाटील हे होते प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे बाल विकास प्रकल्प अधिकारी किशोर गोरे मारुती महाराज कारखान्याचे संचालक शामराव पाटील संस्थेचे अध्यक्ष ॲड बाबुराव मोरे संचालक दयानंद चव्हाण सरपंच अनिता माळी सोसायटीचे चेअरमन ज्योतीराम साळुंखे व संस्थेचे सचिव प्रा दत्तात्रय सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल म्हणाले की आपल्या शाळेचे विद्यार्थी हे उद्याचे देशाचे आदर्श नागरिक घडतील या विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनच विविध क्षेत्रांमध्ये संस्थेचा व गावाचा नावलौकिक निश्चित करतील असे सांगून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व पुढील शैक्षणिक कार्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव दत्तात्रेय सुरवसे यांनी करून संस्थेची माहिती दिली सन 2022 23 या शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर तसेच देवी देवतांचे गीते आणि लोकगीताच्या तालावर उत्कृष्ट नृत्य आविष्कार करून प्रेक्षकांची मने जिंकली वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अनिल मुळे यांच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.