*औसा येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा*
औसा: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या तिथीप्रमाणे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जयंतीचा कार्यक्रम औसा शहरात भव्य स्वरूपामध्ये साजरा करण्यात आला. मराठा समाजाचे महंत राजेंद्र गिरी महाराज आणि महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रतिमेचे पूजन करून शहरातून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीमध्ये अक्षरशः कंटेनरवर सजावट करून छत्रपती शिवरायांची प्रतिमा व सजीव देखावे मिरवणुकीमध्ये लक्ष वेधून घेत होते. वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या निनादात अभंग सादर केले, याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे, माजी नगराध्यक्ष अफसर शेख, युवा सेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, युवा सेना जिल्हा चिटणीस बाळासाहेब नरवडे, शहरप्रमुख आकाश माने, मराठा समाज अध्यक्ष प्रदीप मोरे, अशोक नाईकवाडे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष श्याम भोसले, शहरप्रमुख सुरेशदादा भुरे , व्यंकट नाना माने, संतोष सूर्यवंशी, छावा संघटनेचे नागेश मुगळे, बालाजी माने, आकाश मद्दे, अध्यक्ष सुमित कोद्रे, गणेश गायकवाड, ऋषिकेश सुर्यवंशी, ओमकार आपसिंगेकर, अक्षय माने यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवरायांच्या तिथीप्रमाणे जयंती कार्यक्रमांमध्ये तरुणांनी बेधुंद नृत्य अविष्कार सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेच्या या मिरवणुकीमध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते मिरवणूक कार्यक्रम संपन्न करण्यासाठी पोलिस निरीक्षक शिवशंकर पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.