गुढीपाडव्यानिमित्त मुक्तेश्वर मंदिरात संगीत समारोहाचे आयोजन
औसा प्रतिनिधी श्री मुक्तेश्वर देवालय न्यास औसा आणि मुक्तेश्वर संगीत सभा औसा यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडवा नववर्षाच्या निमित्ताने औसा शहराचे ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर मंदिराच्या दर्शन मंडपामध्ये भव्य संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे या संगीत समारोह कार्यक्रमांमध्ये पंडित विजयकुमार धायगुडे आणि प्रसिद्ध गायक वेदांग धाराशिवे यांचे सुमधुर गायन होणार आहे या कार्यक्रमांमध्ये गुरु श्वेता तंत्रे पाटील यांचे कथक नृत्य सादर करण्यात येणार आहेत तसेच तेजस धुमाळ यांचे तबला सोलो वादन होणार असून एकनाथ पांचाळ व सूर्यकांत घोडके हे हार्मोनियमची साथ संगत करणार आहेत बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी गुढीपाडव्या निमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये संगीत प्रेमी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन संगीत समारोह कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री मुक्तेश्वर देवालय न्यास चे अध्यक्ष ॲड मुक्तेश्वर वाघदरे यांनी केले आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.