सामाजिक कार्य करणार्या व्यक्तींना पुरस्कार जाहीर
लातूर,दि.17 ः समाजहितासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणार्या कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन त्यांना सन्मान करण्याचा ठराव महाराष्ट्र पब्लिक वेल्फेअर असोसिएशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमरदराज खान यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या सामाजीक कार्यकर्त्यांची व त्यांच्या कार्यांची दखल घेत निवड करण्यात आली. या प्रसंगी सय्यद वाजीद, अनवर खान, पटेल रफीउल्लाह यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेल्यांमध्ये राष्ट्रपती पदक विजेते डॉ. असर गाजी, समाजसेवक अॅड. ला. र. शेख, ग्रीन वृक्ष टीमचे सय्यद इमरान, पत्रकार अब्दुल समद शेख, समाजसेवक शेख जफर, माय फाऊंडेशनचे अनवर शेख, आरोग्य सेवा क्षेत्रातील डॉ.शादाब खान, शिक्षण सेवा क्षेत्रातील कलीम भोयरेकर आदींचा समावेश आहे. या सर्व पुरस्कारर्थींचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पब्लिक वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने देण्यात आली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.