पुस्तक विक्रेत्यांना आर्थिक सहाय्य्य करण्याची डॉ बाबासाहेब आंबेडकर पुस्तक-ग्रंथ महोत्सव समितीचे अध्यक्ष अशोक कांबळे याची मागणी
मुंबई-प्रतिनिधी :-लक्ष्मण कांबळे
-कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात आर्थिक विवंचनेत सापडलेल्या राज्यातील पुस्तक विक्रेत्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रनिर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुस्तक-ग्रंथ महोत्सव समितीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे
भारत हा देश संताचा, ,महापुरुषांचा, देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर शूरवीराचा आहे.भारताचा इतिहास, देशासाठी लढणाऱ्या, बलिदान देणाऱ्या शूर वीराचा इतिहास जगासमोर आला पाहीजे या करिता लोकां पर्यंत पुस्तकांच्या माध्यमातून इतिहास पोहचविण्याचे काम देशातील पुस्तक विक्रेते व स्टॉल धारक महाराष्ट्रभर करत आहेत परंतु भारतासह जगामध्ये कोरोना आल्यामुळे शेतकरी कलाकार व विविध क्षेत्रातील लोकांचे भरून न निघणारे मानवी नुकसान,आर्थिक नुकसान झाले आहे राज्य सरकारने यातील काहींना आर्थिक मदतदेखील दिली आहे
देशात, महाराष्ट्रात अनेक असे पुस्तक विक्रेते , स्टॉल धारक आहेत ज्यांच्या कुटुंबांचा निर्वाह केवळ पुस्तक विक्री वर चालतो . कोरोना मुळे देशात लोकडाऊन झाल्यामुळे या पुस्तक विक्रेत्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले.आहे अशावेळी राज्यातील विविध घटकांना आर्थिक सहाय्य्य करणाऱ्या राज्य सरकारने या पुस्तक विक्रेत्यानादेखील माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदत करावी अशी मागणी राष्ट्रनिर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुस्तक-ग्रंथ महोत्सव समितीचे अध्यक्ष अशोक कांबळे यांनी केली आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.