जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने महिला कर्मचाऱ्यांना सेफ्टी हॅन्डग्लोज व पुष्पगुच्छ देवून सन्मान...

 

जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने महिला कर्मचाऱ्यांना सेफ्टी हॅन्डग्लोज व पुष्पगुच्छ देवून सन्मान....








लातूर शहरातील सर्वात गजबजलेल्या परिसर म्हणजे गंजगोलाई व त्याचा परिसर होय.आपण रात्री झोपेत असताना हा परिसर स्वच्छ व चकाचक करणा-या साफसफाई महिला कर्मचाऱ्यांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गंजगोलाई परिसरात कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून राष्ट्रवादी अर्बन व राष्ट्रवादी आयटी सेल व शारदा फाउंडेशनच्या वतीने त्यांना सेफ्टी हॅन्डग्लोज (हातमोजे) व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.त्यांच्या कामाचे कौतुक करून आभार व्यक्त केले.

तसेच यावेळी साफसफाई महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

यावेळी शारदा फाउंडेशनचे मयुरजी बनसोडे, राष्ट्रवादी अर्बन व आयटी सेल शहरजिल्हाध्यक्ष डी.उमाकांत,राष्ट्रवादी असंघटीत कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष आदर्श उपाध्ये,सचिन,सतीश वाघमारे,आकाश कांबळे,सुनिल कांबळे, गणेश सिणगिले,दिपक सुर्यवंशी,विकास माने,यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या