नवनाथ महाराज चिखलीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने औसा ते तेर पायी दिंडीची सांगता
औसा प्रतिनिधी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे औसा तालुका संघटक गोरोबाकुरे यांच्या संकल्पनेतून मागील दोन दशकांपासून संत नगरी औसा ते श्रीक्षेत्र तेर येथील संतश्रेष्ठ गोरोबाकाका यांच्या दर्शनासाठी पायी दिंडीची अविरत प्रथा सुरू आहे. या पायी दिंडीच्या दरम्यान संताचे खेळ, भारुड, भजन, कीर्तन इत्यादी धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल सुरू होती. मंगळवार दिनांक 21 मार्च रोजी समदर्गा मोड औसा येथे ह भ प नवनाथ महाराज चिखलीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या पायी दिंडीची सांगता झाली. काल्याच्या कीर्तनानंतर शेकडो भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था दिंडी संयोजन समितीच्या वतीने करण्यात आली होती. या दिंडीच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री बाळू दंडे, बाळू मोरे, कृष्णा कोलते, बाबुराव यादव, नंदराम, काका जाधव, मुकुंद काळे, बालाजी काळे, आत्माराम मिरकले, शंकर जाधव, वीरभद्र कोपरे, जयसिंग चव्हाण, गजेंद्र जाधव, लक्ष्मण शिंदे, सुशिलाबाई जाधव, बबीता जाधव यांच्यासह अनेक वारकरी महिला पुरुषांनी सहकार्य केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.