तुपडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

 तुपडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन






औसा प्रतिनिधी

 तुपडी येथील भाविक भक्ताच्या सहकार्याने व समस्त गावकरी मंडळीच्या पुढाकाराने दिनांक 11 ते 17 मे 2023 या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताह कालावधीमध्ये काकडा, आरती, हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, हरी किर्तन व हरिजागर अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताह कालावधीमध्ये रात्री नऊ ते 11 या वेळेमध्ये ह. भ. प. सुधीर महाराज होळीकर, संजय कुलकर्णी खडक उमरगा, भागवताचार्य आशाताई राऊत लातूर, साध्वी महंत मुक्ताई, नाथ माऊली महाराज, राजेश पाटील गुंजरगा, निवृत्ती महाराज जांभळवाडी यांचे कीर्तन होणार आहे. दिनांक 17 मे 2023 रोजी ह. भ. प. नितीन महाराज हिप्परगेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे, तरी भाविक भक्तांनी सप्ताह कालावधीमध्ये कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सप्ताह संयोजन समिती तुपडी व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या