शिवसेनेचे संघटन बळकट करणार ----संपर्क प्रमुख रोहिदास चव्हाण अनेक महिला व युवकांचा शिवसेनेत प्रवेश

 शिवसेनेचे संघटन बळकट करणार ----संपर्क प्रमुख रोहिदास चव्हाण

अनेक महिला व युवकांचा शिवसेनेत प्रवेश








 लातूर प्रतिनिधी लातूर जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा भालचंद्र ब्लड बँक लातूरच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता, या मेळाव्याला लातूर, औसा, देवणी ,शिरूर अनंतपाळ व निलंगा या पाच तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना शिवसेना लातूर जिल्ह्याचे नूतन संपर्कप्रमुख  रोहिदास चव्हाण म्हणाले की  ईडी सीबीआय व खोके अशा आमिषाला बळी पडून महाराष्ट्र मध्ये गुण्या गोविंदाने नांदत असणारे सरकार महाविकास आघाडीचे नेतृत्व करत असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे  हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होते,परंतु भारतीय जनता पार्टी आणि शिदे  गटाच्या काही आमदारांनी षडयंत्र आखून शिवसेना  उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होण्यास भाग पाडले. शिवसेना पक्षप्रमुख  उद्धवजी ठाकरे  सत्तेच्या खुर्चीला चिटकून न बसता आपल्याच गद्दाराणी पाठीत खंजीर खुपसला आहे. मला सत्तेची गरज नाही मला गरज आहे. ते सर्वसामान्य शिवसैनिकाची शिवसैनिक शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करणाऱ्या शिवसैनिकाच्या विश्वासावर मी पुन्हा एकदा शिवसेना उभी करणार, हा आत्मविश्वास शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे  आहे निश्चितच उद्धवजी ठाकरे  यांच्या कार्याची पावती सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून घेतलेली निर्णय कोरोना सारख्या महाभयंकर अशा महामारी मध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचे केलेले प्रामाणिक कार्य यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव साहेबाबद्दल प्रचंड सहानुभूतीची लाट निर्माण झालेली आहे. नक्कीच तमाम शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागामध्ये शिवसेनेची बांधणी जिल्हाप्रमुखापासून उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख,विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, बूथ प्रमुख, गटप्रमुख, तसेच शहरातील युवासेना महिला आघाडी, व्यापारी आघाडी,कामगार सेना, विधी आघाडी, शिक्षक सेना,फेरीवाला व्यावसायिक सेना, या सर्व अंगीकृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे शिदोरी घेऊन उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी नियोजनपूर्वक कामाला लागावे. निश्चितच जिल्हाप्रमुख शिवाजी माने साहेब यांच्या कार्यशैलीतून असे दिसून येत आहे,की औसा व निलंगा हे दोन्ही विधानसभा शिवसेनेचा भगवा फडकवतील उद्धव साहेबांचा शिवसैनिक आमदार म्हणून पाठवतील असा विश्वास मला वाटतो. सध्याचे सरकार आऊटघटकेच सरकार असून सलाईन वर लावलेलं सरकार आहे. हे सरकार महाराष्ट्राचे भलं करू शकत नाही,या महाराष्ट्राला विकासाभिमुख दिशा देण्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून शेतकऱ्याला योग्य न्याय द्यायचा असेल सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून द्यायचा असेल माता भगिनी यांचा सन्मान वाढवायचा असेल महाराष्ट्रातल्या मुली सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील जनता निश्चितच शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणानं उभे राहील असा आत्मविश्वास मला वाटतो.

लातूर शहरातून मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात शिवसेनेत सन्माननीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला. इस्माईल खान, शकुद्दीन तांबोळी, नासिर खान, मुस्तफा हनमुरे, अरिफ शेख, अल्ताफ मुल्ला, अजहर खान, इमरान खान, मनमाड खान, इसाक खान, अहमद खान, इरशाद खान,श्रीमान सावरगाव, हुसेन खान, मास शेख, अदनान खान, समीर खान, राजदार खान, अराफत खान, मोहम्मद शेख, इब्राहिम खान, अब्दुल रहीम, बाळू सावरगाव, अशा 26 लोकांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच शिरूर अनंतपाळ तालुक्यातील व्ही एस पँथरचे अभंग घोलपे, अर्जुन कदम, अर्जुन सूर्यवंशी, उत्तम शिरसाठ, मनोज घोलपे, हनुमंत चव्हाण, तानाजी सूर्यवंशी,राहुल चव्हाण, बबलू कांबळे,अशा लोकांनी प्रवेश केला. व सौ गुरुदेवी स्वामी, सौ साक्षी सूर्यवंशी, पूर्णिमा स्वामी, कुमारी सचित्र साखरे, सौ शितल हांडे, या महिलांनी पण शिवसेना लातूर जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला, या सर्वांचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी स्वागत करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या. 


भालचंद्र ब्लड बँक लातूर येथे आयोजित जिल्हास्तरीय शिवसेना मेळाव्यास औसा निलंगा देवणी आणि शिरूर तालुक्यातील शेकडो शिवसैनिक तरुण कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या