शुभाली परिहार यांचे यूपीएससी परीक्षेत उज्वल यश...!

 शुभाली परिहार यांचे यूपीएससी परीक्षेत उज्वल यश...!







 औसा प्रतिनिधी औसा तालुक्यातील मा. खासदार तथा कुलगुरू जनार्दन वाघमारे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या राष्ट्रीय सेवाग्राम स्मृती उद्यान प्रकल्प चलबुर्गा येथील भूमीकन्या शुभाली लक्ष्मीकांत परिहार या विद्यार्थिनीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशांमध्ये 473 वा रँक मिळवून उज्वल यश संपादन केले आहे .शुभाली परिहार यांच्या उज्वल यशाबद्दल चलबुर्गा गावचे सरपंच काशीराम परिहार, उपसरपंच विजयाबाई मोरे, सोसायटीचे चेअरमन प्रभाकर शंकर मोरे,ॶॅ. बाबुराव मोरे,ग्रामीण जनता शिक्षण संस्थेचे सचिव प्रा दत्तात्रेय सुरवसे, पत्रकार शिवाजी मोरे,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्याम परिहार ,प्रा.लक्ष्मीकांत परिहार, सामाजिक कार्यकर्ते राम कांबळे, पत्रकार जयपाल ठाकूर, संगमेश्वर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे संचालक दयानंद चव्हाण, औसा राजपूत समाजाचे अध्यक्ष संतोष वर्मा इत्यादींनी अभिनंदन करून शुभाली परिहार यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या