*ऑटो मध्ये प्रवासी बसवून त्यांना मारहाण करून लुटणाऱ्या 3 आरोपींना ऑटोसह अटक... 11 मोबाईलसह 3 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. जबरी चोरीचे 7 गुन्हे उघड. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.*
स्थानिक गुन्हे शाखा, लातूर ने "" ऑटो मध्ये पॅसेंजर म्हणून प्रवाशांना बसवून घेणे आणि त्याला रनिंग ऑटो मध्ये मारहाण करून त्याचे पैसे आणि मोबाईल काढून घेऊन ढकलून देणे"" अशा पद्धतीने जबरी चोरी करणारे गुन्हेगारांची टोळी पकडून त्यांच्याकडून एकूण 11 मोबाईल, गुन्हे करताना वापरलेले दोन ऑटो, आणि नगदी 7,000 असा एकूण जवळपास 3 लाख 16,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यांच्याकडून 7 जबरी चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले आहेत.
याबाबत थोडक्यात माहिती अशी, लातूर शहरांमध्ये काही दिवसापासून रात्रीच्यावेळी ऑटो मध्ये प्रवासी म्हणून बसून घेऊन ऑटो चालक प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याकडील पैसे व मोबाईल काढून घेऊन लुटत असल्याचे घटना घडत होत्या. त्यावरून विविध पोलीस ठाण्याला गुन्हे दाखल करून तपास करण्यात येत होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी आढावा घेऊन सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना आदेशित केले होते.
त्यावरून पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अमलदारांचे पथके तयार करून त्यांना सदर गुन्हे उघडकीस आणण्याकरिता रवाना करण्यात आले होते.
दिनांक 13/06/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना माहिती मिळाली की, दोन ऑटो चालक त्यांच्याकडील विविध कंपनीचे मोबाईल कमी दरात विकत असून ते सध्या रेनापुर नाका ते डीमार्ट कडे जाणाऱ्या रोडवर थांबून आहेत.अशी माहिती मिळाल्याने तात्काळ सदर पथके त्या ठिकाणी पोहोचून बातमी मधील वर्णनाप्रमाणे रस्त्याच्या साईडला ऑटोसह थांबलेले इसम नामे
1) तोया उर्फ तोहीद उर्फ सोहेल अकबर पठाण, वय 20 वर्ष राहणार, वीरहनुमंतवाडी ,लातूर.
2) महेश उर्फ बाळू योगीराज विभुते, वय 21 राहणार कवा , ह. मुक्काम गुमास्ता कॉलनी, कवा रोड, लातूर.
3) मोहित विजय भडके, वय 23 राहणार 12 नंबर पाटी, श्याम नगर, लातूर.
अशा तीन इसमांना ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी "त्यांच्या ऑटो मध्ये प्रवाशांना बसवून,एकांतात ऑटो थांबवून मारहाण करून लुटण्याचे कबूल केले. तसेच मारहाण करून चोरलेले विविध कंपनीचे 11 मोबाईल, 7 हजार रुपये रोख रक्कम व ऑटो असा एकूण एकूण 3 लाख 16,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे .
लातूर शहरातील विविध पोलीस ठाणेला दाखल असलेल्या अभिलेखाची पडताळणी केली असता नमूद इसमाविरुद्ध पोलीस ठाणे शिवाजीनगर , एमआयडीसी , गांधी चौक, विवेकानंद चौक ,लातूर ग्रामीण येथील एकूण 7 जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले असून ते खालील प्रमाणे
1) पोलीस ठाणे शिवाजीनगर
गुरंन 238/2023 कलम 394,34 भादवि
2) पोलीस ठाणे शिवाजीनगर
गुरंन 264/2023 392,34 भादवि
3)पोलीस ठाणे शिवाजीनगर
गुरंन 266/2023 392,34 भादवि
4) पोलीस ठाणे एमआयडीसी
गुरंन 430/2023 392,34 भादवि
5) पोलीस ठाणे गांधी चौक
गुरंन 231/2023 394,34 भादवि
6) पोलीस ठाणे विवेकानंद चौक
गुरंन 360/2023 392,34 भादवि
7) पोलीस ठाणे लातूर ग्रामीण
गुरंन 150/23 392, 504,506, ,34 भादवि
याप्रमाणे गुन्हे दाखल असून स्थानिक गुन्हे शाखेने नमूद आरोपींना अटक केल्याने जबरी चोरीचे वरील नमूद सात गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्हेगारांकडून आणखीही काही जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हजबे, तुराब पठाण, राजाभाऊ मस्के ,जमीर शेख ,राजेश कंचे ,संतोष खांडेकर, नकुल पाटील यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.