पत्रकार रामभाऊ कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

 पत्रकार रामभाऊ कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा









         औसा (प्रतिनिधी)दि. ४               दैनिक मनोगतचे कार्यकारी संपादक तथा पत्रकारांचे मित्र रामभाऊ लिंबाजी कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. येथील कॉम्प्युटर पार्क येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मनोगतचे संपादक तथा रिंगण लाईव्हचे चीप एडिटर राजू पाटील तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे, यांच्या अध्यक्षतेखाली या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार संघाचे सचिव महेबूब बक्षी, रमेश दूरुगकर, संजय सगरे, विनायक मोरे, एस ए काजी, ईलिहास चौधरी, बालाजी शिंदे, प्रकाश दुधनकर, वामन अंकुश, मुक्तार मनियार, त्याच बरोबर योग गुरु नेताजी सावंत यावेळी उपस्थित होते.                                        यावेळी काशिनाथ सगरे, संजय सगरे, राजू पाटील इत्यादी मंडळीने रामभाऊ विषयी आपले मनोगत व्यक्त तर सत्कारमूर्ती रामभाऊ कांबळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संकटावर मात  करून यशस्वी जीवन कसे जगता येते. याविषयी सविस्तर अशा आपल्या भावना व्यक्त केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या