जवळगा येथे अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 जवळगा येथे अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार






 औसा प्रतिनिधी 


राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त जय मल्हार सेना जवळगा उमादेवी यांच्या वतीने दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी पुण्य




श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच सुधीर बनसोडे, उपसरपंच निलेश काकडे, पोलीस पाटील अनिल फडणीस, जय मल्हार सेनेचे जवळगा उमादेवी शाखेचे अध्यक्ष पप्पू मंगरुळे, ज्ञानेश्वर घोडके, संजय मुळे, सहदेव मुळे, अतुल जाधव, बालाजी माळी, ज्ञानेश्वर मंगरुळे, तुकाराम निंबाळकर , बालाजी मुळे, केदार निकम,मनोहर येनगुरे, आप्पा मुळे यांच्यासह ग्रामस्थ व जय मल्हार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या