शहरात पुन्हा मटक्याचा उद्रेक ? जागोजागी दुकाने थाटली, प्रशासनाची डोळे झाक ? पोलीस अधीक्षक दखल घेणार ?

 शहरात पुन्हा मटक्याचा  उद्रेक ? जागोजागी दुकाने थाटली,  प्रशासनाची डोळे झाक ? पोलीस अधीक्षक दखल घेणार ?









औसा/ प्रतिनिधी :  -गेल्या काही दिवसापासून शहरात खुलेआमपणे मटका सुरू ठेवून मटका माफियाने एक प्रकारे पोलीस यंत्रणेला आव्हान दिले आहे. शहर परिसरातील मटक्याच्या दुकानात पाट्या लावून कल्याण आणि मिलन डे, नावाचा जुगार मटका राजरोसपणे घेतला जात आहे. मटक्यासह अवैध धंदे राजरोसपणे सुरु झाले असून  मटका तर कधी नव्हे पहिल्यांदा उघड उघड सुरु झाला आहे. मटक्यामुळे गोरगरिंबांचे संसार उधवस्त होत आहेत तर पोलिसांचे संसार फुलले जात आहे. कल्याण मटक्यामुळे पोलिसांचे चांगलेच 'कल्याण' झाले असून,  गोरगरीब भिकेला लागले आहे.                                                              शहरातील विविध परिसर व भागात मटक्याचे दुकाने थाटले असून पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. शहरात खुलेआमपणे अवैद्य मटक्याचे 17 हुन जास्त दुकाने थाटली असून या दुकानांची यादीच व्हाट्सअप ग्रुपवर फिरत असल्याने लोकांचे संसार उध्वस्त होण्याची वेळ आली आहे. सदरील मटक्याचे दुकान हे हाश्मी चौक, ऑटो पॉईंट, बस डेपो समोर, शासकीय विश्रामगृह (रेस्ट हाऊस, बॉण्ड्री) बाजूला, न प. सांस्कृतिक सभागृह व्हाट्सअपवर, सरकारी दवाखान्यासमोर व बाजूला पान टपरीवर, पंचायत समितीच्या पाठीमागे, मौलाना अबुल कलाम चौकातील डीपीच्या बाजूला, एसबीआय बँकेच्या बाजूला दोन टपरीत, कालन गल्ली मशिदच्या बाजूला, बस स्टॅन्ड टपरी व लॉन्ड्री दुकान, हनुमान मंदिर पाठीमागे, बाजूला, ढोर गल्लीत चालत फिरत, निलंगा वेस, किल्ला मैदान, स्वच्छतागृहाच्या बाजूला, किल्ला परिसरात महेदी कब्रस्तानला लागून पान टपरीत, गांधी चौक व परिसरात मटक्याचे दुकाने थाटून मटका चालवला जात आहे. काहीही झाले तर आमच्यावर कारवाई होणार नाही, आमचा वशिला मोठा आहे, या अविर्भावामध्ये मटका मालक वावरत आहे. शहरात जागोजागी मटक्याचे दुकाने उघडल्याने पोलीस प्रशासनास आव्हान देत, अवैध धंद्यांना उत आला आहे. शहरात बोकाळलेल्या अवैध धंद्याला अटकाव करण्यास पोलीस प्रशासनास अपयश आले ? असा सवाल होतो. एक प्रकारे पोलीस प्रशासनास आव्हान देत शहरात अवैध धंदे सुरू असून पोलिसांनी केलेल्या दुर्लक्षामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. शहरात खुलेआम मटका घेतला जात असताना, पोलीस प्रशासन मात्र मटका बंद असल्याची वल्गना करत आहेत. शहरात मटका, गांजा विक्री तसेच अवैद्य धंद्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्यानचे बोलले जात आहे. शहराच्या गल्लीबोळात खुलेआम मटक्याच्या दुकानाचे व्यवसाय सुरू असून मटक्याच्या व्यवसायात असणाऱ्या आणि उजळ माथ्याने फिरणाऱ्या वाईट कॉलरमधील काळ्या धंदेवाल्यांना, राजकीय वरदहस्त मिळत आहे ? मटक्याच्या धंद्यासाठी मटका अड्डा चालवण्याचे काम थेट मालक हे एजंट लावून करत आहे. परिसरात एजंटाकडून फिरत्या स्वरूपाचा मटका घेतला जात आहे. मटका कशा पद्धतीने घ्यायचा, तसेच त्याचे कलेक्शन कुठे जमा करायचे, व ते मालकापर्यंत कसे पोहोचवायचे, यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. या मटक्यात गुरफटलेली अनेक कुटुंबे, उध्वस्त होत असून, याचे जळजळीत सत्य उदाहरण शहरात मिळत आहे. मटका मालक, चालकावर कठोर पद्धतीची कारवाई केली जात नसल्याने, या मटका चालकाचे मनोधैर्य उंचावत चालले आहे. मटका मालक नेमका कोण आहे ? कुणाच्या आशीर्वादाने हे सुरू आहे ? त्याचे जाळे नेमके कोठून, कुठपर्यंत पसरलेले आहे ? याची माहिती लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या