पक्षप्रमुख उध्दव ठाकरेच्या युवासेनेचा उपक्रम,पक्षाला बळकटी देण्यास होईल मदत
औसा
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या वतीने अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला.यात एकाच दिवशी तालुक्यातील १० ठिकाणी शाखेचा अनावरण सोहळा करण्यात आला.यामुळे पक्षातील युवाशक्ती वाढण्यासह पक्षाचा प्रसार व प्रचार बळकटी मिळणार आहे.
औसा तालुक्यात शिवसेनाची मजबूत पकड असून त्याला अधिक बळकट करण्यासाठी युवा सेना च्या माध्यमातून औसा तालुक्यात पक्षाची जोरदार बांधणी करण्यात येत आहे तरुण कार्यकर्ते उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात मोठ्या संख्येने सहभागी होऊन गावोगावी पक्षाच्या शाखा सुरू करत आहेत त्यामुळे औसा तालुक्यात शिवसेनाचा आवाज बुलंद होण्यासाठी मोठी मदत होत आहे
युवासेनेचे विभागीय सचिव अक्षय ढोबळे व जिल्हाप्रमुख दिनेश जावळे यांच्या हस्ते नुतन शाखांचे अनावरण करण्यात आले.आज
उजनी, छत्रपती शिवाजी महाराज चौक औसा, शिवगिरी नगर औसा, रामकृष्ण नगर औसा, हसलगन, गांजनखेडा, लामजना, किनीनवरी, सेवालाल चौक सोनपट्टी तांडा आदि ठिकाणचा समावेश आहे.
याप्रसंगी उपस्थित उपजिल्हाप्रमुख अभिजीत जाधव, तालुकाप्रमुख महेश सगर, जिल्हा समन्वयक महेश साळुंखे, जिल्हा चिटणीस बाळासाहेब नरवडे, विधानसभा प्रमुख विशाल क्षिरसागर,तालुका संघटक आकाश सितापुरे ,शहर प्रमुख आकाश माने,तालुका समन्वयक अजित सोमवंशी , अमोल पाटील, तालुकाउप प्रमुख वैभव लंगर,सागर माने,शहर समन्वयक महेश शिरसागर, उपशहर प्रमुख अमोल मोरे, अजित कोकाटे , गणेश क्षिरसागर,पवण इरपे,उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.