पोलीस ठाणे विवेकानंद ची कामगिरी,12 मोटरसायकलसह 5.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. नांदेड जिल्ह्यातील 03 आरोपी अटक

*पोलीस ठाणे विवेकानंद ची कामगिरी,12 मोटरसायकलसह 5.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. नांदेड  जिल्ह्यातील 03 आरोपी अटक


लातूर प्रतिनिधी 
                या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे स्तरावर लातूर शहरातील पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक  गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.
             पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते .
                   त्या अनुषंगाने  पोलीस ठाणे विवेकानंद चे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पथके मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्याच्या तपासात माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी पथकाला माहिती मिळाली की, पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी बाभळगाव चौक परिसरात फिरत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथक तात्काळ बाभळगाव परिसरात पोचून गोपनीय माहिती प्रमाणे रोडवर थांबलेल्या इसमांना ताब्यात घेऊन  विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव 

1) नागेश हनुमंत मोरे, वय 26 वर्ष, राहणार पानशेवाडी, तालुका कंधार जिल्हा नांदेड .

2)णजीवन गणपती सोनटक्के, वय 27 वर्ष, राहणार पानशेवडी, तालुका कंधार जिल्हा नांदेड.

3) श्रीवर्धन आनंद सोनकांबळे, वय 20 वर्ष, राहणार पानशेवडी, तालुका कंधार जिल्हा नांदेड.
               असे असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याकडे गन्ह्या संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले कि, काही  दिवसापूर्वी लातूर शहरातील विश्वसागरसिटी, कातपूररोड येथून 2 मोटारसायकल चोरी केलेली आहे. असे सांगून त्यांनी गुन्ह्यात चोरलेल्या दोन मोटरसायकली एका ठिकाणी लपवून ठेवले असल्याचे सांगितले. पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथील अभिलेखाचे पाहणी केली असता दिनांक 19 ऑगस्ट रोजी सदरचे 2 मोटरसायकल चोरीबाबत गुन्हा क्रमांक 499/2023 प्रमाणे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
             त्यावरून आरोपींना पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे आणून नमूद गुन्ह्यात अटक करून पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस अमलदार श्याम दुड्डे हे करीत होते.
            नमूद अटक आरोपींना विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांनी लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून व नांदेड जिल्ह्यातून अनेक मोटार सायकल चोरल्याचे सांगितले. त्यावरून गुन्ह्यातील आरोपीकडून लातूर व नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी केलेल्या विविध कंपनीच्या 12 मोटरसायकल ज्याची एकूण किंमत 5.5 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
                  मोटार सायकल चोरीचे पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथील 02  गुन्हे उघडकीस आलेले आहेत. मोटार सायकल चोरी संदर्भातील पोलीस लातूर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्याला दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत तपास सुरू आहे
             सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे विवेकानंद चौक पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड, अशोक घारगे, पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे, पोलीस अंमलदार गणेशकुमार यादव, संजय बेरळीकर, गणेश यादव, सारंग लाव्हरे, विनोद चालवाड ,रमेश नामदास, आनंद हल्लाळे, संतोष कलबोने, अनिता सातपुते , अजहर शेख , चार्ली क्रमांक 5 चे चार्ली पोलीस अमलदार शिवकुमार पाटील व ईश्वर जाधव यांनी पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या