औसा शहरातील जामा मस्जिद ते हनुमान मंदिर लातूर वेस पर्यंतचा तिसऱ्या टप्प्याच्या कामाला विलंब होत असल्याने तात्काळ तात्पुरते मजबुतीकरण करावी

तिसऱ्या टप्प्याच्या रस्ता रुंदीकरणाला विलंब होत असल्यास तात्काळ तात्पुरते मजबुतीकरण करा -सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील जामा मस्जिद ते हनुमान मंदिर लातूर वेस पर्यंतचा तिसऱ्या टप्प्याच्या कामाला विलंब होत असल्याने तात्काळ तात्पुरते मजबुतीकरण करावी अशी मागणी एम आय एम च्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
औसा शहरातील बरेच दिवसांपासून रखडलेला तिसरा टप्पा अतिखराब झालेला असून मागील ब-याच दिवसांपासून आम्ही सदर रस्ता करणेबाबत मागणी करीत आहोत परंतु त्यावर कोणतीच कार्यवाही होत नाही.सद्या पावसाचे दिवस असल्यामुळे सदर रस्ता हा अत्यंत खराब झालेला आहे सतत एक आठवड्यापासून पाऊस पडत असताना सदर रस्त्यावर पाणी साचून नागरिकांना, विद्यार्थ्यांना व वयोवृद्ध नागरिकांना चालणे फिरणे कठीण झाले आहे.हा रस्ता मुख्य बाजारपेठ असून या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते मागील कॉन्सिलने मजबुतीकरण करणेबाबत ठराव पास करण्यात आला होता शहरातील प्रत्येक प्रभागात रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.शहरात एकही रस्ता येण्या जाण्यासाठी चांगला राहिलेला नाही त्यावर प्रशासन काम न करता वसुली करीत आहे.तरी या सर्व बाबींचा विचार करून मुख्याधिकारी यांना तातडीने सदर रस्ता हा मजबुतीकरण करुन घेण्यात यावे, अन्यथा एम आय एम पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुज्जफर अली इनामदार यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या