शाळा उभारणीत महत्वाची भूमिका असलेल्या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना भोजन देऊन घेतला निरोप.विद्यार्थ्यांना अश्रू अनावर.

शाळा उभारणीत महत्वाची भूमिका असलेल्या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना भोजन देऊन घेतला निरोप.

विद्यार्थ्यांना अश्रू अनावर.






शेख बी जी

औसा.दि 10. तालुक्यातील मौजे आंदोरा येथील अमृषा बाबा उर्दू प्राथमिक शाळेतील शिक्षिका आहादा सय्यद यांच्या सेवानिवृत्ती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना एक वेगळी भेट देऊन शेवटचा निरोप सदर शिक्षकेने घेतला. शाळा उभारणीमध्ये सय्यद यांचा मोलाचा वाटा होता.शाळेला विनाअनुदानित तत्त्वावर असताना विद्यार्थ्यांना अध्यापनाची भुमिका करणारे, कमी मोबदल्यावर तन मनाने शिकवणाऱ्या शिक्षिकेला निरोप देताना येथील विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर झाल्याचे चित्र दिसून आले. या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मैनोदिन पठाण, मुख्याध्यापक पठाण तय्यब, उच्च माध्यमिक चे मुख्याध्यापक वाजीद पठाण डायटचे शरीफ सर, विस्तार अधिकारी भोसले, सोमाणी सर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात सुरुवातीला पवित्र हज यात्रा करून आलेल्या व्यक्तींचा शाल, श्रीफळ व हार देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात मान्यवरांनी बोलताना सय्यद यांच्याबाबतीत अनेक गौरवोद्गार काढले.यांच्या परिश्रमाच्या कथा विद्यार्थ्यांना सांगितल्या सय्यद यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या मेजवानीची चर्चा गावात दिसून आली. यावेळी शिक्षीका इनामदार गौसीया यांनी सांगितले की सय्यद हे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असायच्या, आम्ही कुठे चुकत असलो की तात्काळ निदर्शनास ती बाब आणून देत.स्वच्छतेच्या व शिस्तीच्या बाबतीत त्यांनी विद्यार्थ्यांनाही मोठे मार्गदर्शन केले. त्यांनी केलेल्या कार्याची आम्हाला सतत आठवण होत राहील. सय्यद यांना भावी आयुष्यात कसल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये यासाठी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करत आहोत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाणीकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मन्सूर शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळेगाव मेहताब,शाकेर पठाण, सोहेल शेख, मणियार अशपाक,कुमठे,काझी,नसरिन सय्यद, टेकाळे ,शेख शेरु, ठाकूर,सांजेकर,यासीन शिक्षिका,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या