सोलापूर- फिरदोस महिला शिक्षण व समाज सेवा संस्था संचलित चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळा सोलापूर या शाळेत भारताचा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थापक हाजी बशीर अहमद बागबान यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हकीम मो. नासीर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शैलेश उंबरे, डॉ. सारिका उंबरे, डॉ. परवेज आलम अतनुरकर, सामाजिक कार्यकर्ते शाहबोद्दीन शेख व फैज अहमद बागवान आणि बहुसंख्येने पालक उपस्थित होते.
यावेळी डॉ. शैलेश व डॉ. सारिका यांच्यातर्फे शाळेच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर गीते, भाषणे व सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले तसेच विद्यार्थ्यांनी यावेळी विविध प्रकारच्या वेशभुषा परिधान केले होते. मुख्याध्यापिका सौदागर गजाला यांनी शाळा व संस्थेची माहिती दिली. सुत्रसंचालन बागवान नेहा यांनी तर यांनी आभार खतिब उम्मे हबीबा मानले.
तसेच चाँद तारा उर्दू प्राथामिक शाळेच्या संस्थापक हाजी बशीर अहमद बागवान यांच्या 75 वा वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी प्राचार्य डॉ. दलाल, ॲड. रफिक बागबान, इकबाल बागबान, डॉ. नौशाद नदाफ , डॉ. परवेज आलम अतनुरकर व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.