या पुढे बौद्धांवर व मागासवर्गीयावर हल्ले कराल तर जशास तसे उत्तर देणार:-लक्ष्मण कांबळे
लातुर रिपोर्टऱ
आज दिनांक 1सप्टेंबर रोजी ईमेलद्वारे मा मुख्यमंत्री,गृहमंत्री, पोलीस आयुक्त, संबंधित सर्व अधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे
प्रतिनिधी;-
दिवसागणिक मागासवर्गीयावर अन्याय अत्याचाराच्या घटना समाजा मध्ये घडत आहेत तरी पण शासन या घटनेकडे गांभीर्याने पाहत नाही यांची मला खंत वाटते ,आजून आम्ही तुमचा त्रास सहन करणार आता आमची अन्याय अत्याचार सहन करून घेण्याची हद्द संपली आहे
जातीवादी लोकांनी आत्ता लक्षात ठेवा जर या पुढे बौद्धांवर व इतर मागासवर्गीयावर जर हाले कराल तर आत्ता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये दाद मागणार नसून आता डायरेक्ट भिडणार व जशास तसेच उत्तर देणार असल्याचे लक्ष्मण कांबळे यांनी मुख्यमंत्री व इतर संबधित अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात जातीयवादी लोकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर याची जयंती काढली, बाबासाहेब आंबेडकर यांची रिंग टोन ठेवली, कधी पाण्याच्या मठाला शिवले, म्हणून तर कधी,मंदिरात गेले, आशा अनेक कारणावरून बौद्धांवर व इतर मागासवर्गीयावर जातीयवादी लोकांकडून वस्तीवर हाले करणे जिवंत मारणे ,देशात हे अनुचित प्रकार घडत असतात , आहेत यावर आम्ही बौद्ध फक्त आता पर्यंत निवेदने देने, मोर्चा काढणे, कँडल मोर्चा काढणे ,असे संवैधानिक प्रकार अवलंबला आहे, यावरती पोलीस पोलीस प्रशासन कधीही बौद्धांच्या तसे इतर मागासवर्गीयाच्या समस्या ह्या गांभीर्याने घेत नाही, दिलेल्या अर्जाची दखल, घेत नाही जातीयवादी लोकांना हाताशी धरून पैशाच्या हव्यासापोटी बौद्धांवरच खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रकार घडवून आणत असतात त्या मुळे आता या पुढे जर बौद्धांवर जीव घेणा हाला, जिवंत मारणे,मारण्याचा प्रयत्न आशा जर घटना देशात कुठे ही घडल्या तर आता पोलीस केस करणार नाही तर आता जशास तसेच उत्तर देणार असल्याचे लक्ष्मण यांनी कांबळे मुख्यमंत्री गृहमंत्री, तसेच सर्व संबंध पोलीस अधीक्षक व अधिकारी यांना ईमेलद्वारे मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.