रेणा सहकारी साखर कारखाना येथे बाॅयलर अग्नी प्रदीपन व गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न
साखर उद्योगात रेणा साखर कारखाना सदैव अग्रेसर- सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब
दिलीप नगर :--
रेणा सहकारी साखर कारखान्याचा १८ वा गळीत हंगाम २०२३- २४ चा बाॅयलर अग्नी प्रदीपन व गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ माजी मंत्री तथा कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब, सौ.सुवर्णाताई दिलीपरावजी देशमुख,माजी मंत्री आ.अमित विलासरावजी देशमुख साहेब,लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासरावजी देशमुख साहेब यांच्या हस्ते विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर संपन्न झाला.
यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे, संत शिरोमणी कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजूळगे, लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, लातूर जिल्हा बँकेचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, मांजराचे व्हा.चेअरमन श्रीशैल उटगे, २१शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, विलास कारखान्याचे व्हा. चेअरमन रविंद्र काळे, राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील, माजी चेअरमन यशवंतराव पाटील, संत शिरोमणीचे व्हा. चेअरमन शाम भोसले, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, रेणापूर बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे, उपसभापती शेषेराव हाके, लातूर जिल्हा बँकेच्या संचालीका सौ. स्वयंप्रभा पाटील, चेअरमन सर्जेराव मोरे, व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, संचालक धनराज देशमुख, संजय हरिदास, चंद्रकांत सुर्यवंशी, संग्राम माटेकर, प्रविण पाटील, तानाजी कांबळे, शहाजी हाके, संभाजी रेड्डी, सौ.वैशालीताई माने, अमृताताई देशमुख,लालासाहेब चव्हाण,अनिल कुटवाड,कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक जाध्व साहेब, मांजरा कारखान्याचे कार्यकारी संचालक पंडीतराव देसाई, विलास साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई, सौ. वनमाला आबासाहेब पाटील यांच्यासह रेणापूर बाजार समितीचे संचालक, पदाधिकारी शेतकरी मोठया संख्येत उपस्थिती होती.
प्रस्तावीक कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे यांनी करताना कारखान्याने आज पर्यंत केलेल्या प्रगती बाबतची पुर्ण माहीती यावेळी दिली व येणारा गळीत हंगाम 2023-24 चांगल्या प्रकारे केले जाईल व गाळपास येणाऱ्या ऊसाला जास्तीत जास्त भाव दिला जाईल असेही सांगीतले
यावेळी मनोगत व्यक्त करत असताना सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब म्हणाले की, रेणा सहकारी साखर कारखाना हा अल्पावधीतच राज्यातील साखर उद्योगात लौकीक प्राप्त करून अग्रेसर राहीला आहे.लवकरच रेणा कारखाना येथे सौरउर्जा प्रकल्प व सीएनजी प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असल्याचे सांगून,रेणाने साखर उद्योगात जे यश मिळवलं ते कायम टिकवून ठेवले आहे, रेणाचा चालू गळीत यशस्वी करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचा दर देण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी बाॅयलर अग्नी प्रदीपन व गळीत हंगाम शुभारंभासाठी कारखान्याच्या पाच विभागातून प्रथम आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व कारखान्याचे संचालक धनराज देशमुख यांच्या हस्ते सपत्नीक होम हवन व गव्हाण पुजन संपन्न झाले.
सुत्रसंचलन कारखान्याचे संचालक अनिल कुटवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन कारखान्याचे कार्यकारी संचालक बी.व्ही. मोरे यांनी केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.