स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी,06 मोटरसायकलसह 2 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. 5 गुन्हे उघडकीस, 2 आरोपी अटक*

 

 स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी,06 मोटरसायकलसह 2 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. 5 गुन्हे उघडकीस, 2 आरोपी अटक*







        लातूर (प्रतिनिधी )      या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक  गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.

             पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते .

                   त्या अनुषंगाने सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 23/10/ 2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार नामे ऋषिकेश मधुकर चव्हाण नवीन रेनापुर नाका परिसरात फिरत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथक तात्काळ  नवीन रेनापुर नाका परिसरात पोचून रोडवर हिरो होंडा स्प्लेंडरसह थांबलेल्या इसमाला विश्वासात घेऊन  विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव 


1) ऋषिकेश मधुकर चव्हाण वय 23 वर्ष, राहणार नांदगाव तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड असे असल्याचे सांगितले.


                 तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या वाहना संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले कि, सदरची  स्प्लेंडर मोटर सायकल काही दिवसापूर्वी लातूर शहरातून चोरी केलेली आहे. तसेच लातूर शहरातील विविध ठिकाणाहून त्याच्या आणखीन साथीदार नामे


2) शंभुराजे सतीश महाजन,वय 24 वर्ष, राहणार शिराढोण, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव.

                   यांच्यासोबत मिळून मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून गुन्ह्यातील नमूद आरोपीला ताब्यात घेऊन त्यांनी लातूर शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी केलेल्या मोटारसायकल बाबत विचारपूस करुन नमूद आरोपीकडून चोरीच्या आणखीन इतर 5 अशा मिळून एकूण सहा विविध कंपनीच्या मोटारसायकली ज्याची एकूण किंमत  2 लाख 15 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.


                      मोटार सायकल चोरीचे पोलीस ठाणे शिवाजीनगर येथील मोटार सायकल चोरीचा एक , एमआयडीसी पोलीस ठाणे मधील मोटरसायकल चोरीचे तीन गुन्हे व औसा पोलीस ठाण्याला दाखल असलेला मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा असे एकूण 05 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. पुढील कार्यवाहीस्तव नमूद आरोपींना पोलीस ठाणे एमआयडीसी च्या ताब्यात देण्यात आल्या असून संबंधित पोलीस ठाणेचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.


             सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, पोलीस अंमलदार माधव बिल्लापट्टे, नवनाथ हासबे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख, संतोष खांडेकर, नकुल पाटील यांनी पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या