राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 1 डिसेंबर रोजी
कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदासाठी थेट मुलाखत
लातूर, दि. 29 (प्रतिनिधी ) : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) या पदासाठी 1 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत लातूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग येथील वॉक इन इंटरव्हूव एनएचएम सेल येथे 12 रिक्त पदांसाठी थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. तरी पात्र उमेदवारांनी या मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी केले आहे.
15 वा वित्त आयोगातंर्गत शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी 1, एल-3 कार्यक्रमातंर्गत ग्रामीण रुग्णालयासाठी 1, एल-2 कार्यक्रमातंर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयासाठी -8, एनयुएचएम उदगीर अंतर्गत अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 2पदे अशी एकूण 12 पदांसाठी मुलाखती होणार आहेत. या मुलाखतीमध्ये पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास दर महिन्याच्या 1 ते 15 तारखेला जिल्हा परिषद आरोग्य विभाग येथील वॉक इन इंटरव्हूव एनएचएम सेल येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 1 ते 15 तारखेला सुट्टी आल्यास पुढील कार्यालयीन दिवशी मुलाखती घेण्यात येतील. उमेदवारांनी मुलाखतीस येतांना मूळ कागदपत्रे व एक प्रत झेरॉक्स सोबत घेवून येणे आवश्यक राहील, असे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी कळविले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.