मोटार सायकल चोरीच्या आरोपीकडून मुरुड येथील एक तर पिंपरी चिंचवड पुणे येथील चार अशा एकूण पाच मोटारसायकली जप्त.पोलीस ठाणे मुरुडची कामगिरी.*
लातूर (प्रतिनिधी )या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे स्तरावर पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.
पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते .
त्या अनुषंगाने पोलीस ठाणे मुरुडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांचे नेतृत्वात पोलीस अमलदारांचे पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून माहिती संकलित करीत होते.
चोरीच्या गुन्ह्याच्या माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी मुरुड शहरात विनाक्रमांकाची हिरो होंडा मोटार सायकलवर दोन इसम संशयीतरित्या भरधाव वेगात वावरात असल्याचे दिसल्याने त्यास थांबवुन त्याचे याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव
1) श्रीकृष्ण रामराव जाधव, वय 26 वर्ष, राहणार शिंदेवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड.
2) नसिरुद्दीन रशीद सय्यद, वय 29 वर्ष, राहणार सीमरी पारगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड
असे असल्याचे सांगितले.
त्यास त्याचे ताब्यातील मोटरसायकल चे कागदपत्राबाबत विचारपुस केली असता, तो उडवा-उडवीची व संयुक्तिक उत्तरे देत नसल्याने त्याचेवर अधिक संशय वाढला.
सदर संशयीत इसमास पोलीस स्टेशन आणून त्याचेकडे कसुन चौकशी केली असता, मुरुड येथे त्याचे ताब्यातील मोटार सायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले व त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने आणखी 04 मोटार सायकली काढून दिल्या. अशा एकूण 05 मोटार सायकली काढून दिल्या. मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्याचे अभिलेखाचे पाहणी केली असता वर नमुद 05 मोटार सायकली पैकी 04 मोटार सायकली पैकी एक मोटर सायकल पोलीस ठाणे दत्तवाडी जिल्हा पुणे शहर तर उर्वरित तीन मोटरसायकली पिंपरी चिंचवड येथील वाकड व पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्याचे हद्दीतून चोरलेल्या निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधिक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर ग्रामीण) सुनील गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली मुरुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्या नेतृत्वात पोलीस अमलदार बाबासाहेब खोपे, बोईनवाड, राठोड, कीर्ते, नागनाथ जांभळे यांनी पार पाडली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.