*धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील ९५% शेतकरयांना अग्रिम पिक विमा वितरीत!*
*तुळजापुर :* धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील जवळपास ९५% शेतकरयांच्या बँक खात्यामध्ये दिवाळी सणाअगोदर वर्ष २०२३-२४ च्या पिक विम्याची २५% अग्रिम रक्कम पोहोचली आहे, अशी माहिती तुळजापुर तालुक्याचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितली आहे.
आतापर्यंत जवळपास ४ लाख ७५ हजार शेतकरयांना खरीप हंगाम पिक विम्याची अग्रिम रक्कम मिळाली आहे तर ही अग्रिम रक्कम मिळाली नाही असे ५००० शेतकरी आहेत. त्यांचाही प्रश्न विमा कंपनी आणि कृषी आयुक्तांशी बोलुन मार्गी लावु, असे आश्वासन आमदार साहेबांनी दिले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.