किल्लारी साखर कारखान्याच्या गळित हंगाम 2023-24 ची सुरूवात!

 किल्लारी साखर कारखान्याच्या गळित हंगाम 2023-24 ची सुरूवात!





*किल्लारी :* येथील 'शेतकरी सहकारी साखर कारखाना'च्या ४० व्या गाळप हंगामाची सुरूवात नानीजधामचे जगद्गुरु  श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या शुभहस्ते मोळी टाकुन झाली. यावेळी नाथ संस्थान औसा येथील ह.भ.प. गुरूबाबा महाराज औसेकर, औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार, माजी खासदार रविंद्र गायकवाड इ. मान्यवर उपस्थित होते. 
     "किल्लारीचा साखर कारखाना अनेक वर्षे बंद पडला होता. तालुक्याचे भाग्यविधाते आमदार अभिमन्यू पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने या कारखान्याला नवसंजीवनी देऊन पुन्हा सुरू केला आहे. तरी परिसरातील तमाम शेतकरयांनी हा कारखाना असाच चालु राहण्यासाठी सहकार्य करावे. विरोधकांनीसुद्धा शेतकरयांच्या हितासाठी  राजकारण बाजूला ठेवून सहकार्य केले तरच या कारखान्याला गतवैभव प्राप्त होईल", असे मत जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी व्यक्त केले. यावेळी परिसरातील ऊस उत्पादक  शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या