हैदराबाद : धर्माच्या आधारावर आरक्षण देणारे तेलंगणा हे एकमेव राज्य असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. राज्यात भाजपची सत्ता आल्यावर मुस्लिमांना दिलेले चार टक्के आरक्षण रद्द करून ते एससी, एसटी आणि ओबीसींमध्ये विभागले जाईल. केंद्रात भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचे ते म्हणाले.
लोकांना तेलंगणात बदल हवा आहे, भाजप तेलंगणाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, जनतेची मते भारताचे भवितव्य ठरवतील यावर अमित शहा यांनी भर दिला. अतिरिक्त बजेट असलेले तेलंगण राज्य निर्माण झाले आणि बीआरएस सरकार कर्जाच्या खाईत अडकले, अशी टीका त्यांनी केली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.