MESTA च्या औसा तालुकाध्यक्षपदी श्री सुलतान शेख यांची एकमताने निवड


MESTA च्या औसा तालुकाध्यक्षपदी

श्री सुलतान शेख यांची एकमताने निवड

     





औसा (शेख उमर प्रतिनिधी )

    आपल्या कार्य कर्तुत्ववाच्या बळावर शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या औशाच्या साई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री सुलतान शेख यांची MESTA च्या औसा तालुकाध्यक्षपदी आज दिनांक 5 नोव्हेंबर रोजी एकमताने निवड करण्यात आली. अशा नियुक्तीचे पत्र जिल्हाध्यक्ष श्री पुष्पराज खुब्बा यांनी आज दिले.

   MESTA अर्थात महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन ही राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि इंग्रजी विषयांच्या शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात राज्यस्तरावर संपूर्ण महाराष्ट्रभर कार्य करते. श्री सुलतान शेख यांचे शैक्षणिक क्षेत्रातील आणि MESTA च्या चळवळीमध्ये त्यांनी केलेले कार्य पाहून आज जिल्हा सभासदांच्या झालेल्या बैठकीमध्ये MESTA च्या औसा तालुका अध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी झालेल्या बैठकीत मेस्टाचे जिल्हा सचिव श्री व्यंकट दापेगावकर लातूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष श्री दत्ता कावळे जिल्हा कार्याध्यक्ष श्री ज्ञानोबा भोसले, जिल्हा उपाध्यक्ष श्री जनक गायकवाड, सहसचिव श्री सुशील वाघमारे, जिल्हा सचिव दत्ता शिंदे व लोकरे सर यांच्यासह इतर अन्य सभासद उपस्थित होते. उपस्थित सर्व सभासदांनी यावेळी सुलतान शेख यांचे अभिनंदन केले.

श्री सुलतान शेख यांची MESTA च्या औसा तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आदींनी अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या