प्रसिद्धीसाठी बाहेर पडलेली बोट बुडाली. शुद्ध पाण्याचा प्लांट नावालाच. पालिकेच्या दुर्लक्षाने झाली दुरावस्था

 प्रसिद्धीसाठी बाहेर पडलेली बोट बुडाली.


शुद्ध पाण्याचा प्लांट नावालाच.









पालिकेच्या दुर्लक्षाने झाली दुरावस्था





शेख बी जी.
औसा.दि.11 औश्याची नगरपालिका नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्ध झोतात असते. लहान बालकांना सुट्टीच्या दिवशी खेळता यावे यासाठी माजी नगराध्यक्ष यांनी तलावात फिरणारी बोट सुरू केली. अनेक प्रसिद्धी माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात जाहिराती वजा बातम्या प्रसिद्ध केल्या.ही प्रसिद्ध झालेली लहान मुलांची बोट पुन्हा पाण्यात बुडाल्याचे चित्र येथील तलावात दिसून आले. या बोटीसाठी मोठा आर्थिक खर्च करण्यात आला होता. तो खर्च पाण्यात बुडाला . माजी नगराध्यक्षांनी काही दिवस या बोटीची निगा राखली व काही दिवस मनोरंजन पण झाले.या ठिकाणी रंगबिरंगी पाण्याचे फवारे असलेले यंत्र देखील पाण्यात बुडाल्याचे दिसून आले. या यंत्रासाठी केलेला खर्च देखील पाण्यात गेला की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
तलावाच्या बाजूला पाच रुपयात शुद्ध पाणी देण्याची योजना राबवली गेली काही दिवस अनेकांनी याचा लाभ घेतला मात्र सद्यस्थितीत हा प्लांट आहे की नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे पाण्याचा प्लांट आहे की पार्किंग ठिकाण? अशी स्थिती निर्माण झाली आहे.
तलावाच्या बाजूला लाखो रुपये खर्च करून उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती या उद्यानात सर्वत्र गाणीचे साम्राज्य पसरले आहे कोणीही या उद्यानात जाण्यास धजत नाही सर्वत्र दुर्गंधी पसरली असल्याने येथील नागरिक या ठिकाणी क्वचितच आढळून येतात.
ही सर्व परिस्थिती या ठिकाणी पालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे निर्माण झाली आहे अशी चर्चा या ठिकाणच्या नागरिकांमध्ये आहे.
पाण्यासाठी असलेली टाकी येथील घाण पाण्यात दिसून आली. आजूबाजूला वराहांचा वावर दिसून आला. याबाबत माजी नगराध्यक्ष जावेद शेख यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की आमच्या काळामध्ये या सर्व बाबी व्यवस्थित होत्या मात्र पालिकेच्या मनमानी कारभारामुळे या सर्व बाबींची दुरावस्था झाल्याचे त्यांनी सांगितले.
या झालेल्या सर्व दुरावस्थेकडे पालिकेने लक्ष देऊन पाण्याचा प्लांट लहान मुलांची बोट व उद्यान व्यवस्थित करावे अशी मागणी या ठिकाणचे नागरिक करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या