हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ” एम .आय .डी.सी. भागात सुरु....

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ” एम .आय .डी.सी. भागात सुरु....


 



लातूर/प्रतिनिधी- शहरातील नागरिकांना त्यांच्या परिसरात आरोग्य सुविधा मिळण्यासाठी महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत उपलब्ध जागेमध्ये मनपामार्फत नागरी दवाखाने चालू करण्यात येत आहेत .


या अंतर्गत दि. ११/१२/२३ रोजी एमआयडीसी भागातील अग्नीशमन कार्यालय परिसरात महापालिकेमार्फत “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” चालू करण्यात आला. दवाखान्याचे उदघाटन महानगरपालिकेचे आयुक्त श्री.बाबासाहेब मनोहरे यांचे हस्ते करण्यात आले .यावेळी आरोग्य विभागाचे उपायुक्त श्री.रावसाहेब कोळगणे, आरोग्य अधिकारी डॉ. महेश पाटील ,अग्निशमन अधिकारी श्री.सुभाष कदम ,शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.रामेश्वर कलवले, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनम पटेल व कर्मचारी उपस्थित होते.


या दवाखान्यामुळे एमआयडीसी भागातील कामगार वर्ग व इतर रहिवासी, हुडको भागातील व परिसरातील नागरिक, शासकीय वसाहतीतील नागरिक यांना प्राथमिक आरोग्य सुविधा त्यांच्या परिसरातच उपलब्ध होणार आहे. सदरील दवाखाना सुट्टीचे दिवस वगळून दररोज दुपारी २.०० ते रात्री १०.०० वा.पर्यंत चालू राहणार आहे.

तरी परिसरातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. 








बाला साहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट, उनका अस्पताल " एम.आई.डी.सी. क्षेत्र में शुरू ...

 

लातूर/प्रतिनिधी - शहर के नागरिकों को उनके इलाके में ही स्वास्थ्य सुविधाएं उपलब्ध कराने के लिए नगर निगम द्वारा राष्ट्रीय शहरी स्वास्थ्य मिशन के तहत उपलब्ध जगह में नगर पालिका के माध्यम से सिविल क्लीनिक चलाये जा रहे हैं.

चलो भी आंतरिक डीटी. 11/12/23 को एमआईडीसी क्षेत्र के फायर ऑफिस क्षेत्र में नगर निगम द्वारा "हिंदू ह्रदयसमारत बालासाहेब ठाकरे आप दवाखाना" खोला गया था। अस्पताल का उद्घाटन नगर निगम आयुक्त श्री बाबासाहेब मनोहरे ने किया। इस अवसर पर स्वास्थ्य विभाग के उपायुक्त श्री रावसाहेब कोलगने, स्वास्थ्य अधिकारी महेश पाटिल, अग्निशमन अधिकारी श्री सुभाष कदम, शहर कार्यक्रम प्रबंधक डॉ.रामेश्वर कलवाले, चिकित्सा अधिकारी डॉ. अनम पटेल एवं स्टाफ उपस्थित रहा।

इस क्लिनिक के कारण एमआईडीसी क्षेत्र के श्रमिक वर्ग और अन्य निवासियों, हुडको क्षेत्र और आसपास के क्षेत्र के नागरिकों, सरकारी कॉलोनी के नागरिकों को उनके इलाके में प्राथमिक स्वास्थ्य देखभाल सुविधाएं प्रदान की जाएंगी। उक्त क्लिनिक अवकाश को छोड़कर प्रतिदिन दोपहर 2.00 बजे से रात्रि 10.00 बजे तक खुला रहेगा।

हालांकि, लातूर सिटी नगर निगम की ओर से अपील की जा रही है कि इलाके के नागरिक इस सुविधा का लाभ उठाएं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या