*अनुभूती व करूणा म्हणजे काव्य - प्रा. डॉ. तस्लिम पटेल.
प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेच्या लातूर शाखेच्या वतीने २८ जानेवारी रोजी आॅनलाईन कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान लातूर येथील युवा साहित्यिक इस्माईल शेख या भूषविले तर संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध साहित्यिक विचारवंत प्रा. डॉ. तस्लिम पटेल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना पटेल यांनी मी काव्य लिहिले नसले तरी मी काव्याची अनुभूती घेतली आहे. म्हणून काव्य म्हणजे अनुभती व करूणा होय ही मी केलेली काव्याची व्याख्या आहे. या कविसंमेलनात प्रमुख उपस्थिती म्हणून समाजसेवक महताब पठाण देखील उपस्थित होते.या कविसंमेलनाचे प्रास्ताविक संस्थापक कवी शफी बोल्डेकर व संस्थेचे उपाध्यक्ष खाजाभाई बागवान यांनी केले तर संमेलनाची भूमिका संस्थेच्या सहसचिव अनिसा सिकंदर शेख यांनी मांडली या कविसंमेलनात एकापेक्षा एक अशा सरस कविता ऐकायला मिळाल्या. त्यात अहमद पिरनसाहब शेख वसमत हिंगोली ,श्री सुमीत विलास हजारे कल्याण (ठाणे) , सायराबानू चौगुले रायगड ,मुबारक उमराणी सांगली, वाय.के.शेख,पारगांव पुणे ,मो.अ.रहीम चंद्रपूर, अकबर इस्माईल म्हमदुले ,रजिया डबीर , गौसपाशा शेख, शाहिदा बेगम अहमदपूर, अख्तर पठाण नासिक , मेहमूदा शेख देहुगाव , दिलशाद सय्यद अहमदनगर , सुलक्षणा सरवदे लातूर , ॲड शबाना नबीलाल मुल्ला विटा, सारीका देशमुख उस्मानाबाद, तहेसीन सय्य्द लातूर ,रसूल दा.पठाण उदगीर यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड .सीमा पटेल व कवयित्री तहेसीन सय्यद यांनी केले तर आभार सारीका देशमुख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रीय अध्यक्ष ॲड .हाशमपटेल, तहसीन सैय्यद, ॲड. सीमा पटेल यांनी पुढाकार घेतला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.