आरोग्याची काळजी घ्या परिक्षेत यश नक्की मिळेल " डॉ.रफिक शेख

"आरोग्याची काळजी घ्या परिक्षेत यश नक्की मिळेल " डॉ.रफिक शेख

शेख बी जी.


औसा.दि.29. शहरातील हिंदुस्तानी एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित अजीम माध्यमिक मराठी व उर्दू शाळेमध्ये 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर' शाळा या उपक्रमांतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बोलताना डॉक्टर रफिक शेख यांनी आरोग्याची काळजी घ्या परीक्षेत यश हमखास मिळेल.अशा प्रकारचा मंत्र विद्यार्थ्यांना दिला. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की समाजामध्ये राहत असताना सर्वात महत्त्वाची धनसंपदा आरोग्य ही आहे. आरोग्याची काळजी घेतल्यानंतर आपोआपच शरीर सर्व कामे करण्यास सशक्त राहील. म्हणून सर्वांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.अशा प्रकारचे प्रतिपादन त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले.या कार्यक्रमाचे शाळीमार्फत करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे केसरी सर होते.पर्यवेक्षक शेख टी एम यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक शेख बी जी ,अभय लांडे व निटुरे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान विषयाचे समीर खान पठाण यांनी केले.यानंतर येथील उर्दू माध्यमिक शाळेमध्ये शिबिर संपन्न झाले या ठिकाणी शाळेचे पर्यवेक्षक डॉ.खालील सिद्दिकी व,शेख गुलनाज, सय्यद हिना , सिद्धीकी अजीम सर, पठाण समीर सर शेख परवेज सर,शिक्षक उपस्थित होते. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना आरोग्य संबंधी काय अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परवेज शेख,समीर खान पठाण यांनी परिश्रम घेतले. शेवटी नीटुरे सर यांनी आभार प्रदर्शन व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या