बेपत्ता मुलींला शोधण्यात यश. पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे औसा ची 24 तासात कारवाई.*


*बेपत्ता मुलींला शोधण्यात यश. पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे औसा ची 24 तासात कारवाई.*


लातूर (प्रतिनिधी )याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 30/01/2024 रोजी पोलीस ठाणे औसा येथे अल्पवयीन मुलीचा अपहरण झाल्याच्या तक्रारीवरून भादवि कलम 363 प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस नमूद मुलीचा शोध घेत होते परंतु ती मिळून येत नव्हती.
            पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे कडून सदर मुलींचा शोध घेण्यासाठी औसा पोलिसांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.
                 त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा रामदास इंगवले यांचे मार्गदर्शनात औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड व त्यांच्या टीमने सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना अपहरण झालेल्या मुली संदर्भात खूप काही उपयुक्त माहिती नसतानाही गोपनीय व सायबर सेल कडून मिळालेल्या माहितीचे बारकाईने विश्लेषण करून मिळालेल्या माहितीवरून सदर मुलींचा शोध घेऊन ती लातूर ते उमरगा बसने प्रवास करीत असताना बस मध्ये मिळून आली.त्याला ताब्यात घेण्यात आले.
        सायबर सेल कडून मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या व गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिस निरीक्षक सुनील रेजितवाड आणि टीम ने अतिशय तात्काळ कार्यवाही करत बेपत्ता मुलीचा अवघ्या 24 तासात शोध घेऊन तीला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपी मुलास अटक करण्यात आली आहे. 
              सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी औसा रामदास इंगवले यांचे मार्गदर्शनात, औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड, महिला पोलीस उपनिरीक्षक राठोड, पोलीस अमलदार भुरे, भन्डे, वाडकर, मंदाडे सायबर सेल चे संतोष देवडे,गणेश साठे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या