रस्ता सुरक्षा अभियान -2024 अंतर्गत वाहतुक नियंत्रण शाखा, लातूर व इंडियन मेडीकल असोशिएशन ,लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबिराचे आयोजन


*रस्ता सुरक्षा अभियान -2024 अंतर्गत वाहतुक नियंत्रण शाखा, लातूर व इंडियन मेडीकल असोशिएशन ,लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबिराचे आयोजन.*



             रस्ता सुरक्षा अभियान - 2024 अंतर्गत वाहतुक नियंत्रण शाखा, लातूर व इंडियन मेडीकल असोशिएशन, लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने अॅटोरिक्षा, काळी पिवळी, टॅक्सी, ट्रॅव्हल्स, मालवाहतुक करणारे वाहन चालकांसाठी व पोलीस अंमलदार व कुटूंबियासाठी "मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर"
         रस्ता सुरक्षा अभियान अभियान-2024 हा दिनांक 15 जानेवारी 2024 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत राष्ट्र व राज्याचे वतीने साजरा करण्यात येत आहे. त्यात लातूर पोलीसचे मार्फतीने वाहतुक अनुषंगाने सामाजीक बांधिलकीचे उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन आज दिनांक 04/02/2024 रोजी सकाळी 10:00 वा. वाहतुक नियंत्रण शाखा, लातूर येथे लातूर पोलीस व इंडियन मेडीकल असोशिएशन, लातूर यांचे संयुक्त विद्यमानाने अँटोरिक्षा, काळी पिवळी टॅक्सी, ट्रॅव्हल्स, माल वाहतुक करणारे वाहन चालकांसाठी "नेत्र तपासणी, रक्त तपासणी, ईसीजी, अस्थिरोग,पूर्ण आरोग्य तपासणी व रक्तदान " घेण्यात आले. 
        सदर शिबीराकरीता मोठ्या संख्येने अटोरिक्षा, काळी पिवळी टॅक्सी, ट्रॅव्हल्स, माल वाहतुक करणारे वाहन चालकांनी नोंदणी करुन मोफत तपासणीचा लाभ घेतला. सदर शिबीरात अटोरिक्षा, काळी पिवळी टॅक्सी, ट्रॅव्हल्स, माल वाहतुक करणारे वाहन चालकांची मानांकित दर्जाचे एमडी, एमबीबीएस डॉक्टर्स तपासणी करुन मार्गदर्शन व उपाय सूचाविले.
               दि. 04/02/2024 रोजीचे "नेत्र तपासणी, रक्त तपासणी, ईसीजी, अस्थिरोग इत्यादी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर" मध्ये अॅटोरिक्षा, काळी पिवळी, ट्रॅव्हल्स, माल वाहतुकीचे वाहन चालक मोठ्या संख्येने हजर होते. तसेच वाहतूक शाखेमार्फत वाहतूक सुरक्षा विषयावर चित्रकला व स्लोगन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा व वेळोवेळी पथनाट्यातून वाहतूक नियमासंदर्भात जनजागृती करणारे नवोदय विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थ्यांचाही सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव व कौतुक करण्यात आले.
         सदर कार्यक्रमास सोमय मुंडे, लातूर जिल्हा पोलीस अधिक्षक, डॉ. अजय देवरे (अपर पोलीस अधिक्षक, लातूर), सुनील गोसावी (SDPO, लातूर ग्रामीण) गणेश कदम (पोलीस निरीक्षक शहर वाहतुक शाखा) डॉ.अनिलजी राठी (अध्यक्ष, IMA लातूर नेत्रतज्ञ) डॉ. अशोकजी पोदार (उपाध्यक्ष, IMA लातूर ऑर्थोपेडिक तज्ञ) डॉ. आशिष चेपूरे (सचिव, IMA लातूर मानसोपचार तंज्ञ) सुधाकर देडे (पोलीस निरीक्षक, गांधी चौक) प्रतिभा ठाकूर (सहायक पोलीस निरीक्षक शहर वाहतुक शाखा) यांच्यासह नामांकित डॉक्टर्स, विविध ट्रॅव्हल्स चे चालक, पत्रकार बंधू, पोलीस व त्यांचे कुटुंबीय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
             कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गालिब शेख यांनी केले. त्यांचाही प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या