तेरणा महाविद्यालय , उस्मानाबाद येथे दि.०२/०२/२०२४ रोजी 'कै.बाजीराव पाटील आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा ' उत्साहात संपन्न झाली . या स्पर्धेत सांघिक व वैयक्तिक स्पर्धेत लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली. ही स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर , स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ,सोलापूर या तीन विद्यापीठांतर्गत संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खुली ठेवण्यात आली होती. स्पर्धेचे २६ वे वर्ष होते.या स्पर्धेसाठी विषय होता ' एक देश, एक निवडणूक : लोकसभा व विधासभेच्या निवडणूका एकत्रित घेणे योग्य आहे/नाही '. या स्पर्धेची सुरुवात कै. बाजीराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. प्रारंभी कु. समृद्धी देशमुख व कु.माहेश्वरी गायकवाड यांनी स्वागत गीत सादर केले. या स्पर्धेचे उद्घाटन तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे व्यवस्थापकीय समन्वयक प्रा.गणेश भातलवंडे यांनी केले. मार्गदर्शनपर वक्तव्यात त्यांनी स्पर्धेचा विषय ज्वलंत असून असे विषय विद्यार्थांच्या विचारांना चालना देणारे असतात आणि विद्यार्थ्यांच्या विचारातून समाजास ज्ञान व माहिती मिळते , असे मत व्यक्त केले.तर अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.अशोक घोलकर यांनी केला. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. अशोक घोलकर यांनी स्पर्धेपाठीमागील भूमिका विषद केली. आज व्यक्तिमत्त्व विकास साधावयाचा असेल तर आपण व्यासपीठावर आले पाहिजे ,बोलले पाहिजे. असे सूचित केले . यावेळी आय. टी. आय. चे प्राचार्य प्रा. प्रज्योत वाघ , सर्व परीक्षक गण ,डॉ. चंद्रजित जाधव उपस्थित होते. पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट चे विश्वस्त मा.विजेंद्र चव्हाण , मा. बाळासाहेब वाघ यांच्या शुभहस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. या प्रसंगी विश्वस्त मा.अशोकभाऊ शिंदे यांनी ऑडियो रेकॉर्डिंग माध्यमातून विजेत्यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी मा. देविदास पाठक ( पत्रकार, दै.तरूण भारत), डॉ. हनुमंत माने ( छत्रपती शिवाजी महाविद्यालय , कळंब ) , डॉ. स्मिता कोल्हे ( डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय,धाराशिव ) व डॉ. रशिद सय्यद ( तेरणा महाविद्यालय , धाराशिव ) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.तसेच मा. देविदास पाठक व डॉ. हनुमंत माने यांनी परीक्षक म्हणून मत व्यक्त करत असताना लो आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास अशा स्पर्धेतून होत असतो . त्यामुळे आपण स्पर्धेत सहभागी व्हायला हवे, असे मत व्यक्त केले. या स्पर्धेत कायमस्वरूपी चषक राजर्षी शाहू महाविद्यालय , लातूर संघाने पटकाविला. तर वैयक्तिक प्रथम क्रमांक रु.५००१/- चे पारितोषिक घोडके प्रमोद दत्तात्रय ( राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर ) ,द्वितीय क्रमांक रू.३००१/- चे पारितोषिक मोरे प्रतीक्षा बळीराम ( राजर्षी शाहू महाविद्यालय , लातूर ) तर तृतीय क्रमांक रू.१००१/- चे पारितोषिक लिमकर प्रतीक्षा शिवाजी रा. गे. शिंदे.महाविद्यालय,परंडा ) तसेच प्रत्येकी ५०१ रुपयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक वैष्णव तेजस शिवदास ( बिल गेट्स कॉलेज,धाराशिव) , जांगिड गायत्री श्रावण ( तेरणा महाविद्यालय, धाराशिव ), गायकवाड प्रतीक प्रकाश ( रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,धाराशिव )व सक्राते ऐश्र्वर्या दत्तात्रय ( अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव ) यांनी पटकाविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजिका डॉ.अनघा तोडकरी यांनी केले . सूत्रसंचालन डॉ.तुळशीराम उकिरडे यांनी तर आभार डॉ.मंजुषा बाबजे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी ,संघ प्रमुख ,स्पर्धक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.