लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा सज्ज वार्तांकन करताना पत्रकारांनी आचारसंहितेचे पालन करावे- अविनाश कोरडे

 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा सज्ज वार्तांकन करताना पत्रकारांनी आचारसंहितेचे पालन करावे- अविनाश कोरडे


 औसा प्रतिनिधी 

नुकत्याच होऊ घातलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 239 औसा विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून औसा तालुक्यातील 211 आणि निलंगा तालुक्यातील 96 मतदान केंद्रावर मतदारांना मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. औसा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 1,55,210 पुरुष 136,226 महिला आणि 3 तृतीयपंथी असे एकूण 2 लाख 91 हजार 439 मतदार असून लोकसभा निवडणुकीमध्ये वृत्तपत्राच्या माध्यमातून तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बातम्या करीत असताना पत्रकारांनी ही आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन औसा - रेणापूर उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे यांनी केले. दिनांक 18 मार्च 2024 सोमवार रोजी तहसील कार्यालय औसा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अविनाश कोरडे यांनी ही माहिती सांगितली. यावेळी तहसीलदार भरत सूर्यवंशी, गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, आणि निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार यांची उपस्थिती होती. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण औसा विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्यात आली असून पोस्टल मतदारांना मतपत्रिका पुरविण्यात येणार आहेत तसेच 80 वर्षे वयावरील व्यक्ती, दिव्यांग मतदार यांच्यासाठी विशेष व्यवस्था प्रत्येक मतदान केंद्रावर करण्यात येणार असल्याची ही माहिती त्यांनी यावेळी सांगितली. औसा विधानसभा मतदारसंघांमध्ये औसा तालुक्यातील 108 तर निलंगा तालुक्यातील 52 अशा 160 गावांचा समावेश आहे संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर विशेष व्यवस्था आणि सुरक्षा तैनात करणार असल्याचीही माहिती अविनाश कोरडे यांनी यावेळी दिली. लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणामध्ये पार पाडता यावी म्हणून एकूण विधानसभा मतदारसंघात 32 झोन करण्यात आले असून 32 झोनल अधिकारी नियुक्त केले असून 6 झोनल अधिकारी राखीव तैनात करण्यात आले आहेत. युवक महिला 80 वर्षावरील वृद्ध व्यक्ती आणि दिव्यांग यांच्यासह सर्वच मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या