ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी व सहसंपर्कप्रमुख नामदेव चाळक यांचा सत्कार
लातूर :लातूर जिल्हा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. लातूर जिल्हातील पक्षाची बांधणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बाबतीत सविस्तर चर्चा करण्यात आली विधानसभा निवडणुकी नंतर प्रथमच पक्षाची जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत नवीन जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी व सहसंपर्कप्रमुख नामदेव चाळक यांचा जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या बैठकीस लिंबन महाराज रेशमे महिला जिल्हा संघटक जयश्री उटगे, सौ. सुनीता चाळक, महानगर प्रमुख सुनील बसपुरे, युवती प्रमुख अँड. श्रध्दा जवळगेकर, युवा सेना प्रमुख दिनेश जावळे, निलंगा तालुकाप्रमुख अविनाश रेशमे, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे, संतोष सुर्यवंशी, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष विलास लंगर, सहकार सेना जिल्हाध्यक्ष किशोर जाधव, खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, देवणी तालुका प्रमुख मुकेश सुडे शिवाजी चव्हाण, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष बसवराज मंगरूळे अँड. रवी पिचारे, संजय उजळबे, रेखा पुजारी, दैवशाला सगर, सुनीता भोसले, सतीश शिवणे, सुनील नाईकवाडे, शंकर रांजनकर, रमेश माळी यांच्या सह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.