जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 11 रुग्ण · हिंगोली जिल्ह्यात 81 रुग्णांवर उपचार सुरु

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 11 रुग्ण
·   जिल्ह्यात 81 रुग्णांवर उपचार सुरु
 
 
हिंगोली, दि.16: इमामोदीन शैख़ 
जिल्हा रुग्णालय, हिंगोली यांच्याकडून आज रोजी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 11 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना केअर सेंटर्सचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे विवरण पुढीलप्रमाणे आहे.
 हिंगोली पोस्ट ऑफीस जवळ, नवा मोंढा येथील 77 वर्षीय पुरुष, कासारवाडा येथील 65 वर्षीय पुरुष आणि आझम कॉलनीतील 58 वर्षीय पुरुष तर वसमत येथील ब्राह्मण गल्लीतील 45 वर्षीय पुरुष, गुलशन नगर येथील 32 वर्षीय महिला, जुमा पेठ येथील 63 वर्षीय पुरुष, सम्राट कॉलनीतील 40 वर्षीय महिला आणि  स्टेशन रोड येथील 15 वर्षीय मुलगा तसेच हिंगोली तालूक्यातील पेडगाव येथील 3 व्यक्ति असे एकुण 11 जणांना कोविड-19 ची लागण झाली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्ड येथे भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 2 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तसेच 2 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे 4 कोविड-19 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 373 रुग्ण झाले आहेत. त्यापैकी 292 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 81 रुग्णांवर उपचार चालू आहेत.
 
****
                                   
सुशिक्षीत बेरोजगारांसाठी ऑनलाईन
पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
 
      हिंगोली, दि.16 : सुशिक्षित बेरोजगार युवक - युवतींसाठी  खाजगी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली व उगम ग्रामिण विकास संस्था, उमरा महास्त्रोत कन्सल्टंट यांच्या संयुक्त विद्यमाने  दि. 23 ते 25 जुलै, 2020  या कालावधीमध्ये पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.
            या मेळाव्यास जय बालाजी इन्टरप्रायजेस औरंगाबाद, पेस स्किल ट्रेनींग सेंटर लातूर, नवभारत फर्टिलायझर लि. औरंगाबाद, सेक्युरिटी ऍ़ण्ड इंटिलीजन्स सर्व्हीसेस इंडिया लि. या उद्योजकांनी पुढील रिक्त पदे अधिसुचित केली आहेत. यामध्ये सेल्समन रिप्रेसेन्टटेव्ही, ट्रेनी फिटर, ट्रेनी इलेक्ट्रीकल, ट्रेनी मशिनीस्ट आणि सिक्युरिटी गार्ड या पदाचा समावेश आहे. रोजगार मेळाव्यास सहभागी होण्यासाठी www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर úरोजगारú या पर्यायावर  क्लिक करुन नोकरी साधक हा पर्याय निवडावा. युजर आयडी व पासवर्डव्दारे लॉगइन करुन प्रोफाईल मधील दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या पर्यायाव्दारे हिंगोली जिल्हा निवडून रोजगार मेळाव्यास ऑनलाईन अर्ज करावा.
            शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी सदर मेळाव्यास ऑनलाईन सहभागी होण्याचे आवाहन श्रीमती रेणुका तम्मलवार, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या