** पित्याच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या व्यक्तींस पोलीस प्रशासनाकडून अभय मिळत असल्यामुळे मुलाचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे सी. आय. डी. मार्फत तपास करण्याची मागणी.**
* एक प्रस्ताव अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई व मानवाधिकार आयोग दिल्ली यांच्या कडे रवाना *
औसा
.
मातोळा येथे दिनांक 10 /05 / 2020 रोजी बाबुराव निवृत्ती राजे यांनी धनंजय राम भोसले [राम लिंबाजी भोसले] यांच्या शेतात गळफास लावून जीवन संपविले. सदरील घटनेचा तपास भादा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करीत आहेत परंतु सदर तपास यंत्रणेवर मयत बाबुराव राजे यांचा मुलगा सुरज बाबुराव राजे यांनी आलेल्या अनुभवावरून अविश्वास दाखवला व सदरील प्रकरणाचा तपास हा सी. आय. डी. मार्फत करावा असे अर्ज निवेदन जिल्हाधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी लातूर व जिल्हा पोलीस अधीक्षक लातूर यांच्याकडे केले आहे.
या घटनेच्या वेळी मयताच्या खिशात सुसाईड नोट होती त्यामध्ये"आपल्याला सतत शेतीकरिता दबावतंत्र वापरून स्वतःला व कुटुंबियांना सतत त्रास दिला जात आहे. होणाऱ्या त्रासाच्या भीतीपोटी जीवन संपवीत आहे."जवळपास अशा आशियाचा मजकूर व काहींची नावे होती. सुसाईड नोट व एफ. आय .आर.व मध्ये जेवढी नावे आहेत त्यातील काही व्यक्तींना अटक केले व काहींना अटक न करता मोकळे सोडले. व संबंधित अधिकाऱ्यास तोंडी विचारणा केली असता ते फरार आहेत असे सांगितले .परंतु सदर व्यक्ती गावात मोकाट फिरताना आढळत आहेत. व ज्यांना अटक केली होती ते जामिनावर सुटून गावात आल्यावर पुन्हा "जीवे मारण्याच्या धमक्या, केस मागे घे नाहीतर तुझ्यावर खोट्या केसेस करून आत मध्ये टाकू"अशा पद्धतीने धमकावणे सुरूच आहे. "आमच्या कुटुंबियांना सदरील व्यक्तींच्या हस्ते परहस्ते जीवितास धोका वाटत आहे, म्हणून आमच्या कुटुंबाला संरक्षण द्यावे.एकंदरीत पाहता सदरील पोलीस यंत्रणेकडून जे आरोपी आहे त्यांना अभय मिळाल्यासारखे वाटते म्हणून सदरील प्रकरणाचा तपास हा सीआयडी मार्फत करावा व न्याय द्यावा "
अशा मजकुराचे निवेदन सुरज बाबुराव राजे यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना केले आहे.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.