आ.अभिमन्यु पवार यांचे स्तुत्य, प्रेरणादायी निर्णय..*



*आ.अभिमन्यु पवार यांचे स्तुत्य, प्रेरणादायी निर्णय..*
मज़हर पटेल 
.... औसा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मा.अभिमन्यु पवार यांनी कोरोना काळात घरी बसून न राहता जनतेत राहून जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सतत धडपडत राहीले. प्रशासकीय यंत्रणे सोबत बैठका घेवून सर्वसामान्यांच्या प्रश्नांची वेळेवर सकारात्मक उकल करण्यासाठी मार्गदर्शन व प्रसंगी स्वतः प्रत्यक्ष जायमोक्यावर हाजर राहून कार्य करीत राहीले. , सर्व जबाबदारी पार पाडतांना नेमके स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेण्यात हलगर्जीपणा झाले अन् कोरोनाने डाव साधला. अचानक बातमी आली की साहेबांना कोरोनाने गाठले. पण ! कोणत्याही चक्रव्युहाची तमा बाळगेल तो अभिमन्यु कसला ? 
  आमदार साहेबांनी कोरोनाचा चक्रव्युह यशस्वीपणे भेदून पुन्हा जनसामान्यांच्या सेवेत रुजू झाले. दवाखान्यातून परत आल्यावर पहिला निर्णय म्हणजे "प्लाझमा डोनेट" करण्याचा जाहीर केला.
  साहेब आपल्या निर्णयाचे स्वागतच ! अखंड मानवजात सदैव ऋणी राहील. 
  कोरोना सतत वाढतच आहे. शासन-प्रशासन उपाययोजना आखण्यात व्यस्त आहे.
 आपल्यामुळे जीवनददान मिळणारे अनेक रुग्ण व त्याचे कुटुंबीय आपले सदैव ऋणी राहतील... शतशः आभार...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या