औशाचे आ.अभिमन्यू पवार कोरोनातून मुक्त




https://www.laturreporter.in/

औशाचे आ.अभिमन्यू पवार कोरोनातून मुक्त
औसा मुख्तार मणियार
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान केंद्र येथील डॉक्टर्स, नर्सेस यांची मेहनत आणि माझ्यावर प्रेम करणा-या हजारो हितचिंतकांच्या सदिच्छा, आर्शिवाद, प्रार्थना यांचे फलस्वरुप मी कोरोना मुक्त झालो आहे.अशी प्रतिक्रिया आ. अभिमन्यु पवार यांनी फेसबुक द्वारे दिली आहे.बुधवारी करण्यात आलेली माझी स्वब टेस्ट निगेटिव्ह आली असून १६ जुलै गुरुवार रोजी डिस्चार्ज मिळाला आहे.१० दिवस होम कारंटाईन मध्ये राहण्याची सूचना डॉक्टरांनी दिली असल्याने २६ जुलै पर्यंत घरीच थांबावे लागेल असेही त्यांनी म्हटले आहे.यावेळी जिल्हाधिकारी जी श्रीकांत, अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय ढगे याच्यासह इतर अधिकारीही उपस्थित होते. अत्यंत स्नेह पूर्ण वातावरणात, आपुलकीने मला रुग्णालयातून निरोप दिला.अशी भावना अभिमन्यु पवार यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या