मुस्लिम मराठी साहित्य चळवळीच्या तालुका अध्यक्षपदी फजल मुल्ला देगलूर प्रतिनिधी ( संतोष चिद्रावार) देगलू येथी मराठी साहित्य चळवळीती नेहमी अग्रेस असणारे सहशिक्षक साहित्यिक पत्रकार व्याख्याते व उत्तम निवेदक फजल मुल्ला यांची ग्रामीण मुस्लिम साहित्य चळवळ महाराष्ट्र या संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली . या चळवळीचे जिल्हा अध्यक्ष शेख निजाम गवंड गावकर यांनी नुकतेच त्यांना पत्रकार रामचंद्र भंडरवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती झाल्याची घोषणा केली . ग्रामीण भागातील मुस्लिम मराठी कवी लेखक कादंबरीकार नाटक कार यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यात मराठी साहित् विषयी रुची वाढवणे अडीअडचणी दूर करणे मराठी साहित्य समृद् करण्यासाठी प्रयत्न करणे ग्रामीण भागातील मुस्लिमांना युवकांना लिहिते व बोलके करणे ग्रामीण भागातील मुस्लिम युवकांची जडण-घडण आणि आविष्कार व स्वतःला व्यक्त करण्यासाठी वैचारिक मानसिकता तयार करणे इत्यादी ध्येय या चळवळीद्वारे शहरासह ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी या चळवळीचे संस्थापक अध्यक्ष शेख शफी बोडेकर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि मराठवाडा प्रमुख माननीय . हसन पटेल व जिल्हा अध्यक्ष शेख निजाम गवंडगाव कर यांच्या नेतृत्वाखाली फजल मुल्ला सर यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.