तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे बाबत जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत मा. पंतप्रधान निवेदन
उस्मानाबाद :- ( जिल्हा प्रतिनिधी तौफिक कुरेशी ) शरण बसवराज पाटील अध्यक्ष - युवक काँग्रेस उम्मानाबाद विरोधी पक्षनेता यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले आहे
युवकासाठी वर्षाला २ कोटी रोजगारानिर्मिती करण्याचे आश्वासन देऊन पंतप्रधान मोदी सरकार सत्तेवर आले , पण परिस्थिती वेगळीच आहे . नोटबंदीमुळे भारतात सर्वात जास्त रोजगारनिर्मिती करणाऱ्या कृषी व सूक्ष्म - लघु - मध्यम उद्योग मोठा फटका बसला . त्याची परिणती म्हणजे करोडो रोजगार नष्ट होण्यात आली . त्यात वस्तू सेवा कराच्या ( GST ) चुकीच्या अंमलबजावणीमुळे कुटीर लघु - मध्यम क्षेत्राचे आणि उद्योगधंदयाचे पार कंबरडे मोडले गेले . याचा परिणाम म्हणजे बेरोजगारी मोठया प्रमाणात वाढली . सरकारच्या भारतीय सांख्यीकी आयोगाच्या ( NSC ) अहवालानुसार देशात २०१७-१८ या वर्षात बेरोजगारीचा दर ६.१ टक्के असुन ग्रामीण भागातला बेरोजगारीचा दर ५.३ टक्के होता . शहरी भागात ७.८ टक्के राहिला . कोरोना मध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक म्हणजे १३ ते २७ टक्क्यावर पोहंचला होता . पंतप्रधान मोदी यांच्या २० लाख करोड पॅकेज मधून बेरोजगार युवक शेतकरी या लधु - मध्यम उद्योग क्षेत्र या पैकी कोणत्याही घटकास मदत झालेली नाही . केंद्र सरकार बिगर भाजप शासित राज्यांची आर्थिक कोंडी करण्यात धन्यता मानत आहे . अशा परिस्थितीत बिगर भाजप शासित राज्यांना कारभार चालविणे मुश्किल होऊन वसले आहे . सरकारी अस्थाषणाचे खाजगी करण करुन सरकारी नौकन्या व आरक्षण संपविण्याचा रा . स्व . संघाचा अजेंडा मोदी पुर्णत्वास नेत आहेत . पंतप्रधान मोदीने हे सर्व करण्यापेक्षा दरवर्षी २ कोटी रोजगार निर्मितीचे आश्वसनाला जागून रोजगार निर्मितीवर लक्ष दिले पाहिजे युवक हे निराश झालेले आहेत , आत्महत्तेचे प्रमाण वाढत आहे . केंद्र सरकारने रोजगार निर्मितीची स्वतःची जबाबदारी ढकलून चालणार नाही . तरुण हाताला काम हवे आहे . मोदी सरकारकडे आमची एकच मागणी आहे रोजगार दो असे निवेदनात नमुद केले आहे.
या निवेदनावर रोहित पडवळ , शशिकांत निरपळ , अँड. दर्शन कोळगे , जावेद काझी , सलमान शेख , राम कदम , अनिल नायगांवकर , बालाजी बीदें , विजय घोगरे , मंकरद डोंगरे इत्यादीच्या स्वाक्षरी आहेत
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.