कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अनुसुचित जातीच्या व्यक्तिच्या कुटुंबाला कर्ज देण्याची योजना

 दिनांक 29  जून 2021


 अल्ताफ शेख प्रतिनिधि उस्मानाबाद





कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अनुसुचित जातीच्या


व्यक्तिच्या कुटुंबाला कर्ज देण्याची योजना


*अर्ज करण्याचे आवाहन*


 उस्मानाबाद,दि.29 जून :-नवी दिल्ली येथील एनएसएफडीसीच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत कोविड-19 या जागतिक महामारीत अनुसूचित जातीच्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाला असल्यास त्या कुटुंबियाचे पुनर्वसन करण्यासाठी and Support for Marginalized Individuals for Livelihoods Enterpric (SMILE)ही व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे.


     या योजनेची माहिती, अटी आणि शर्ती पुढील प्रमाणे आहेत.प्रकल्प मूल्य एक लाख ते पाच लाख रुपये, एनएसएफडीसी सहभाग 80 टक्के,भांडवल अनुदान 20 टक्के,व्याजदर सहा टक्के,परतफेडीचा कालावधी सहा वर्ष.


पात्रता:-अर्जदार अनुसूचित जातीतील असावा.अर्जदाराचे वार्षिक उत्पन तीन लाख रुपयांपर्यंत असावे.अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाच्या कुटुंबातील सदस्य असावा.( कुटूंब प्रमुखाच्या रेशनकार्डवर या सदस्यांचे नाव असणे बंधनकारक)मृत्यू पावलेल्या व्यक्तींची वयामर्यादा 18 ते 60 च्या दरम्यान असावी. मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीकरिता पुढीलपैकी एक दस्तावेज आवश्यक आहेत. महानगर पालिका/नगरपालिका यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र. स्मशानभूमी प्राधिकारणाने दिलेली पावती. एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास गट विकास अधिकाऱ्याने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र.

आवश्यक कागदपत्रे:-मयत व्यक्तीचे नाव पत्ता.आधारकार्ड. उत्पनाचा दाखला (तीन लाख रुपयांपर्यत) कोविड-19 मुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यू दाखला.रेशन कार्ड.वयाचा पुरावा.कोविड-19 चा प्रादुर्भावामुळे 15 जून 2021 पर्यंत मृत्यू झालेल्या अनुसूचित जातीतील (SC) कुटुंबातील व्यक्तीने वरील माहिती  महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात दि.30 जून 2021 पर्यंत द्यावी,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्या.) यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या