औशाच्या दोन नगरसेवकावर अपात्रतेची कारवाई

 औशाच्या दोन नगरसेवकावर अपात्रतेची कारवाई !





औसा (प्रतिनिधी) औसा नगरपरिषदेतील भारतीय जनता पार्टीच्या दोन नगरसेवकांचा विरोधात नगराध्यक्ष अफसर शेख यांनी त्यांना त्या नगरसेवकांना अपात्र करावे असे आव्हान दिले होते नगरविकास मंत्रालयाने या प्रकरणी सुनावणी घेऊन भाजपचे नगरसेवक सुनील उटगे आणि उमेश वाघधरे या यांना नगरसेवक पदावर राहण्यास अपात्र ठरविले आहे.

महाराष्ट्र राज्याचे नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नगरसेवक सुनील उटगे व उमेश वाघदरे यांना स्वतः किंवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी संधी दिली होती.परंतु तांत्रिक कारण पुढे करून दोन्ही नगरसेवक यांना म्हणणे मांडण्यास दोन्ही नगरसेवकांनी टाळाटाळ केली होती. या प्रकरणी रिट याचिका क्रमांक 71 22 / 20 19 व अवमान याचिका क्रमांक 398 / 20 20 उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार विहित कार्यवाही करणे आवश्यक वाटल्याने सर्व अभिलेख विचारात घेऊन महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 42 नुसार सुनील उटगे व उमेश वाघदरे यांना औसा नगर परिषदेच्या सदस्य पदावरून दूर करण्यात येत असून आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीसाठी दोघांनाही पालिका सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरविले ठरविले आहे. आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीसाठी दोघांनाही पालिका सदस्य होण्यास अपात्र ठरवून इतर कोणत्याही इतर स्थानिक प्राधिकरणाचा सदस्य होण्यास अपात्र ठरवले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या