आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

 

आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा








निलंगा/लातूर (प्रतिनिधी) : जिल्हयाचे माजी पालकमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस जिल्हयात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. आ. निलंगेकर यांनी वाढदिवसा निमित्त जिल्हयात 51 हजार वृक्षारोपण करण्यात यावे असे आवाहन केले होते, त्यानुसार जिल्हयात विविध ठिकाणी वृक्षारोपणासह ग्रामदेवतास अभिषेक, रुग्णांना फळ वाटप व अन्नदान या सह विकास कामांचा शुभारंभ व उदघाटन असे कार्यक्रम घेण्यात आले.

जिल्हयाचे माजी पालकमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसा निमित्त निलंगा शहर व तालूक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. निलंग्याचे ग्रामदैवत निलकंठेश्वरास दुग्धाभिषेक तर सर्व धर्मीयांचे श्रध्दा स्थान असलेल्या दादापिर व पिरपाशा दर्ग्यास चादर चढवून आ. निलंगेकर यांच्या दिर्घायुशासाठी प्रार्थना करण्यात आली. त्याच बरोबर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्प अर्पण करण्यात आले. यानंतर निलंगा येथे उपजिल्हा रुग्णाल्यात जि. प. उपाध्यक्षा सौ. भारतबाई साळूंके व चेअरमन दगडू साळूंके यांच्या हस्ते तर पंचायत समिती सभापती राधाताई बिराजदार व उपसभापती सौ. अंजली बोंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. शहरासह तालूक्यातही प्रार्थमिक व उप आरोग्य केंद्र यासह जि.प. शाळांच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी जिल्हा संघटक सरचिटणीस तथा जि.प. सदस्य संजय दोरवे, तालूकाध्यक्ष शाहूराज थेटे, उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, शहराध्यक्ष ॲङ विरभद्र स्वामी, माजी सभापती अजित माने, तानाजी बिराजदार ,  शरद पेठकर,रवि फुलारी, ईनानी आदींसह पदाधिकारी, लोकप्रतिनीधी यांची माठ्या संख्येने उपस्थिती होती. आ. निलंगेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन निलंगा शहरातील भूमी अभिलेख कार्याल्याच्या संरक्षक भिंतीच्य कामाचा तर तालूक्यात विविध ठिकाणी पाणंद रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

लातूर शहरात विविध कार्यक्रम

माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसा निमित्त लातूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर रत्नेश्वरास सतिष मिर्चे (काका) व शहर जिल्हा भाजपाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यावेळी बस्वराज मुस्तापूरे, संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार, मनपा गटनेते ॲङ शैलेश गोजमगुंडे, उपाध्यक्ष मनोज सुर्यवंशी, चिटणीस ॲङ दिग्विजय काथवटे यांच्यासह मंडल अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहर भाजपाचे सुरेश राठोड यांच्या पुढाकारातून वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, मिना भोसले, नगरसेवीका सौ. वर्षा कुलकर्णी, सौ. शोभा पाटील, सौ. श्वेता लोंढे, वामन राठोड, नितिन हासाळे, अशिष मुळे, संध्या जैन, प्रगती डोळसे, ज्याती रसाळ आदींची उपस्थिती होती.

शहरातील गोशाळेत प्रेरना होनराव व सतिष मिर्चे (काका) यांच्या हस्ते गोमातांना चारा देण्यात आला. त्याच बरोबर जिल्हा रुग्णाल्यात रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले. यावेळी अभिजीत मुनाळे, बळवंत गायकवाड, प्रदिप दिक्षीत, रवी कांबळे, दत्ता पेटकर आदिंसह पदाधिकारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होत. जिल्हयातील विविध तालूक्यांमध्ये 51 हजार वृक्ष लागवड उपक्रमा अंतर्गत लोकप्रतिनिधी पक्ष पदाधिकारी यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. कोरोना संकट काळत आरोग्य दुत म्हणुन कार्य करणाऱ्या आशा ताईंसह कोरोना योध्यांचा सन्मानही करण्यात आला.


--
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या