*महानगरपालिके मार्फत 30 ते 44 व 45 वर्ष पुढील
वयोगटासाठीचे लसीकरण सात केंद्रावर होणार*
30 ते 44 वर्षे वयोगटातील पहिल्या डोससाठी 50 टक्के ऑनलाईन
व 50 टक्के ऑनस्पॉट लसीकरण
लातूर,दि.19(जिमाका):-लातूर शहर महानगरपालिके मार्फत कोविड-19 लसीकरणाचे दिनांक 21 जून 2021 रोजीचे वेळापत्रक नागरिकांच्या माहितीसाठी पुढील प्रमाणे आहे. 30 ते 44 व 45 वर्षे पुढील वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र पुढील प्रमाणे आहे. नागरीकांची गर्दी जास्त झाल्यास गरजेनुसार सत्र चालू होण्यापुर्वी टोकन क्रमांक देण्यात येतील,अशी माहिती लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त यांनी दिली आहे.
विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था, लातूर,दयांनद कॉलेज बार्शी रोड, लातूर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (I.T.I. कॉलेज, छत्रपती शिवाजी चौक लातूर), विवेकानंद प्रा.विदयामंदिर (शिवाजी शाळा प्रांगण),लेबर कॉलनी लातूर, यशवंत शाळा प्रा.ना.केंद्र, साळे गल्ली, लातूर,प्रा.ना.आरोग्य केंद्र,राजीव नगर,विवेकानंद चौक लातूर व प्रा.ना.आरोग्य केंद्र,मंठाळे नगर, (मनपा शाळा क्र.09),लातूर येथे कोव्हीशिल्ड लस दिली जाणार आहे.
30 ते 44 वर्षे वयोगट व 45 वर्षे पुढील वयोगटासाठी कोव्हिशिल्ड लस 30 ते 44 वयोगट फक्त पहिला डोस, 45 वर्षे पुढील वयोगट- 45 वर्षावरील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस (पहिला डोस घेवून 84 दिवस पूर्ण झालेल्यांना दुसरा डोस देय राहील) HCW व FLW यांचा पहिला व दुसरा डोस, कोविशिल्ड ऑनस्पॉट सकाळी 10 ते सायं.5 वाजपर्यंत राहील. 30 ते 44 वर्षे वयोगटातील पहिल्या डोससाठी 50 टक्के ऑनलाईन व 50 टक्के ऑनस्पॉट लसीकरण करण्यात येणार आहे, याची संबंधित नागरिकांनी नोंद घ्यावी.
मोबाईल पथक लसीकरण केंद्र (संबंधित परीसरातील नागरीकांसाठी) Near To Home दत्तुसिंग प्राथमिक शाळा,विक्रमनगर व मनपा शाळा क्र.13,सोफिया मज्जीद जवळ,माधव नगर, लातूर,45 वर्ष पुढील वयोगट कोव्हिशिल्ड लस 45 वर्षेावरील नागरीकांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस (पहिला डोस घेऊन 84 दिवस पुर्ण झालेल्यांना दुसरा डोस देय राहील ) HCW व FLW यांचा पहिला व दुसरा डोस ऑनस्पॉट सकाळी 10 ते सायं.5 वाजपर्यंत राहील.
शहरातील इतर लसीकरण केंद्र दि. 21 जून 2021 रोजी बंद राहतील याची नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपायुक्त लातूर शहर महानगरपालिका लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
वृत्त क्र.503
*जिल्हा प्रशासनामार्फत 21 जून रोजी
आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होणार*
*जिल्हाधिकारी यांच्या फेसबुक पेज वरून सकाळी 7 ते 8 या कालावधीत लाईव्ह योग दिवस साजरा होणार*
*कोविड च्या पार्श्वभूमीवर घरी राहूनच सर्व नागरिकांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करावा*
लातूर, दि.19(जिमाका):- केंद्र शासनाने दरवर्षीप्रमाणे 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याविषयी कळविले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने एकत्रित येण्यास बंदी असल्याने जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त घरामध्ये बसूनच जिल्हाधिकारी लातूर यांच्या फेसबुक पेज वरून लाईव्ह योग प्रात्यक्षिके करून योग दिन साजरा करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
दिनांक 21 जून 2021 रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस हा "Be with yoga Be at home" या संकल्पनेवर आधारित असून यावर्षीचा योग दिन हा सातवा योग दिन आहे. त्यामुळे या संकल्पनेवर प्रत्येकाने घरांमध्ये राहून सुरक्षित अंतराचे पालन करून योगाभ्यास करावा अशा सूचना मुंबई येथील राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक यांनी दिल्या आहेत.
लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने covid-19 या पार्श्वभूमीवर कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तंतोतंत पालन करून हा आंतरराष्ट्रीय योग दिन क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉल येथून जिल्हाधिकारी लातूर यांच्या फेसबुक पेज वरून सकाळी सात ते आठ वाजता या कालावधीत साजरा होणार आहे. या फेसबुक पेज वरून योगाभ्यासाची प्रात्यक्षिके दाखवली जाणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हाधिकारी लातूर यांच्या पेजवर जाऊन लाइव योग प्रात्यक्षिके सुरक्षित अंतर ठेवून घरीच करावेत असे करावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, आरोग्य उपसंचालक डॉक्टर एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, आयुष विभागाचे अधिकारी डॉक्टर विकास पाटील यांनी केले आहे.
दिनांक 21 जून 2021 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे प्रात्यक्षिक सादर होण्यापूर्वी काही कालावधी अगोदर समाज माध्यमे व फेसबुक पेज वरून लिंक पाठवण्यात येणार आहे.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.